IND vs NZ, ICC World Cup 2019: न्यूझीलंड विरुद्ध भारताला चार धक्के; राेहित शर्मा-विराट कोहली, के एल राहुल आणि कार्तिक बाद
(Photo by Jordan Mansfield/Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वचषकमध्ये भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील सेमीफायनलमधील सामना काल (मंगळवारी) थांबवण्यात आला होता. त्यामुळे आज राखीव दिवशी सामना सुरु झाला. मंगळवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या. त्यामुळे आजचा सामना 46.2 चेंडूपासून सुरु झाला. उर्वरित ओव्हर खेळात न्यूझीलंडने शेवटच्या 4 षटकात केवळ 3 विकेट गमावत 28 धावा केल्या. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 239/8 धावा केल्या. या धाव संख्येचा पाठलाग करत न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारताला तीन मोठे धक्के दिले. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये रवींद्र जडेजा मार्फत रॉस टेलर याच्या रन-आऊटला बनवले माध्यम, हॉटस्टारने साधला संजय मांजरेकर यांच्यावर निशाणा)

टीम इंडियच्या आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल (KL Rahul) 1 धाव करत माघारी परतले. भारताला विजयासाठी 240 धावांची आवश्यकता असून रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यावर भीस्त आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री (Matt Henry) ने रोहित, राहुल आणि दिनेश कार्तिक याला बाद केले तर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) ने कर्णधार कोहलीला माघारी धाडले. कार्तिक 6 धावा करत झेल बाद झाला.

दरम्यान, किवीजसाठी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) ने सर्वाधिक धावा केल्या. विल्यमसनने 67 तर टेलरने 74 धावा केल्या. विल्यमसन आणि टेलरच्या अर्धशतकी खेळीमुळे न्यूझीलंडला 200 धावांचा आकडा ओलांडता आला.