(Photo Credits: Twitter)

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आयसीसी (ICC) समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सामन्यात प्लेयिंग एलेव्हनमध्ये घेतल्याबद्दल मांजरेंजर आणि माजी ऑस्ट्रेलिया (Autralia) क्रिकेटपटू माइकल वॉन (Michael Vaughan) यांच्यात बिनसले. परिणामी मांजरेकर यांनी वॉन यांना ट्विटरवर ब्लॉक केले. आणि आता मांजरेकर यांच्यावर निशाणा साधत हॉटस्टार (Hotsrar) यांनी एक मजेदार ट्विट केले. (IND vs NZ, World Cup 2019: न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 240 धावांचे लक्ष; केन विल्यमसन, रॉस टेलर ने सावरला किवीचजा डाव)

हॉटस्टारच्या या ट्विटमध्ये जडेजाने मार्फत न्यूझीलंड फलंदाज रॉस टेलर याच्या रन-आऊट दाखवले आहे. मात्र, हे ट्विट शेअर करताना हॉटस्टारनी लिहिले, "जडेजा द्वारे फेकलेला तो डायरेक्ट हिटने स्टंपला बिट्स ऍण्ड पिसेसमध्ये मोडून काढला."

दरम्यान, जडेजा हा 'बिट्स ऍण्ड पिसेस' खेळाडू असल्याचं मांजरेकर म्हणाले होते. युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी इंग्लंड विरुद्ध मॅचमध्ये खराब कामगिरी केली होती. यानंतर एका स्पिनरला काढून जडेजाला संधी द्यावी का, असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा 'मी थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करु शकणाऱ्या जडेजासारख्या खेळाडूंचा चाहता नाही. जडेजा हा सध्या त्याच्या 50 ओव्हरच्या कारकिर्दीमध्ये असा खेळाडू आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मात्र तो पूर्ण बॉलर आहे. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये मी टीममध्ये बॅट्समन आणि स्पिनरना संधी देईन', असं मांजरेकर म्हणाले होते.