IND vs NZ 2nd Test: मुंबई टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस बनू शकतो खलनायक, वानखेडेच्या खेळपट्टीवरही परिणाम होण्याची शक्यता
भारत-न्यूझीलंड कसोटी (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 3 डिसेंबर, शुक्रवारपासून मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस खलनायक ठरू शकतो. कानपुरच्या ग्रीन पार्क येथे झालेला पहिला सामना अनिर्णित राहिल्यवर दोन्ही संघ आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी मुंबईसह  (Mumbai) महाराष्ट्राच्या अन्य शहरांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून वानखेडेच्या खेळपट्टीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खेळपट्टीवरून गोलंदाजांना मदत होऊ शकते असे मानले जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे ही दोन्ही संघांसाठी निर्णायक कसोटी असेल. तसेच टी-20 मालिका आणि पहिल्या सामन्यातून विश्रांतीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली संघात म्हणून पुनरागमन करेल. (IND vs NZ 2nd Test 2021: मुंबई कसोटीवर पावसाचे सावट, चाहत्यांच्या आंनदावर पाणी फिरण्याची शक्यता)

बुधवारी दिवसभर पावसामुळे दोन्ही संघांना त्यांचे सराव सत्र रद्द करावे लागले. गुरुवारीही पावसाचा अंदाज आहे आणि मैदान ओले राहील. वानखेडेच्या खेळपट्टीवर अजिबात गवत दिसत नाही, ज्यामुळे संथ गोलंदाजांना मदत होईल. मात्र शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही मदत करेल असे अपेक्षित आहे. याशिवाय पावसाच्या संततधारमुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली असून त्यामुळे पृष्ठभागाखाली भरपूर आर्द्रता राहील. त्यामुळे अतिरिक्त ओलावा नक्कीच कानपूरपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत करेल, परंतु अशा विकेटमुळे फिरकीपटूंनाही बरेच वळण मिळू शकते. दरम्यान शुक्रवारी देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे परंतु दोन्ही संघ दुसऱ्या ते पाचव्या दिवशी हवामान अडथळा बनणार नाही अशी आशा करत असेल.

दुसरीकडे, या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघाच्या संयोजनाकडेही सर्वांचे लक्ष लागले लागून आहे. कर्णधार विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाल्यास कोणाचा पत्ता कट होतो जे जाणून घेण्यासाठी सर्व चाहते उत्सुक आहेत. तसेच मानेच्या दुखापतीमुळे यष्टिरक्षक रिद्धिमान साहा बाहेर बसू शकतो आणि श्रीकर भरतला पदार्पणाची संधी मिळू शकते. दरम्यान मुंबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असल्यामुळे इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला जाऊ शकतो किंवा उमेश यादवसोबत हे दोघेही वेगवान गोलंदाज त्रिकूट तयार करू शकतात आणि अशा परिस्थितीत अक्षर पटेलला बाहेर बसावे लागू शकते.