IND vs NZ 2nd Test 2021: मुंबई कसोटीवर पावसाचे सावट, चाहत्यांच्या आंनदावर पाणी फिरण्याची शक्यता

महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Light Rain) पडेल, वातावरण ढगाळ राहील असा अंदाज दिला गेला आहे. मुंबईत बुधवारपासून म्हणजेच आज सकाळपासून पाऊस पडत आहे.

क्रिकेट Nitin Kurhe|

IND vs NZ (Photo Credit Twitter & FB)

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Mumbai Wankhede Stadium) दुसरी आणि शेवटची कसोटी (IND vs NZ Mumbai Test) खेळवण्यात येणार आहे. मात्र या कसोटी सामन्यावर संकटाचे काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. मुंबईत बुधवारपासून म्हणजेच आज सकाळपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे  या दोन्ही संघांना त्यांचे सराव सत्र रद्द करावे लागले. पावसामुळे वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी झाकली गेली आहे. बीसीसीआयने (BCCI) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "भारतीय संघाचे बुधवारी होणारे सराव सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले आहे." भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्या कसोटीसाठी मंगळवारी संध्याकाळी कानपूरहून मुंबईत पोहोचले.

हवमान विभागाने दिलेल्या महितीनुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Light Rain) पडेल, वातावरण ढगाळ राहील असा अंदाज दिला गेला आहे. मुंबईत बुधवारपासून म्हणजेच आज सकाळपासून पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य पावसाची शक्यता विचारात घेऊन हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काहींना यलो अलर्ट जारी केला आहे. (हे ही वाचा IND vs NZ 1st Test 2021: कानपुरमध्ये पहिली कसोटी अनिर्णित, ‘या’ Kiwi खेळाडूंनी भारताच्या विजयाची संधी हिरावली.)

शुक्रवारपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. अशा स्थितीत पावसामुळे त्याचा त्रास होण्याची शक्यता दाट आहे. मात्र, शुक्रवारी हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास कसोटीच्या तयारीवर नक्कीच परिणाम होणार आहे. मुंबई कसोटी सामन्याला महाराष्ट्र सरकारने 25 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवाणगी दिली आहे. काल तिकिट विक्रीला सुरुवात झाली असु अवघ्या 30 मिनिटांत सगळी तिकिट विकली गेली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change