अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघात मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. भारतासाठी शतकवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि अक्षर पटेलची (Axar Patel) जोडी खेळपट्टीवर खेळत आहे. तर भारताने दिवसाच्या पहिल्या सत्राअखेरीस सहा बाद 285 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने (Ajaz Patel) आतापर्यंत सर्व सहा विकेट घेतल्या आहेत.