IND vs NZ 2020: जसप्रीत बुमराह ला गोलंदाजीचा सल्ला दिल्याने संजय मांजरेकर झाले ट्रोल, Netizens म्हणाले 'तुम्ही कोचसाठी अर्ज करा'
संजय मांजरेकर, जसप्रीत बुमराह (Photo Credit: IANS)

बुधवारी हॅमिल्टनमध्ये भारत (India) आणि यजमान न्यूझीलंडमधील (New Zealand) तिसर्‍या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या सुपर ओव्हरबद्दल संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. हॅमिल्टनमध्ये टीम इंडियाने तिसर्‍या टी-20 मध्ये सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभूत करून 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी मिळविली पण या विजयानंतर बुमराहवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरवात केली. या सामन्यात बुमराहने अत्यंत खराब कामगिरी केली. 4 ओव्हरमध्ये 45 धावा लुटवल्यानंतर बुमराहने सुपर ओव्हरमधेही 17 धावा दिल्या. बुमराहच्या खराब कामगिरीवर संजय मांजरेकर यांनी ट्विट करुन त्याला गोलंदाजीचा सल्ला दिला आहे. ज्यानंतर चाहते मांजरेकरांना जोरात ट्रोल करत आहेत. बुमराहला त्याच्या वेगळ्या आणि धोकादायक यॉर्कर्समुळे क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पण बुमराह सुपर ओव्हरमध्ये अप्रभावी राहिला आणि न्यूझीलंडसाठी सुपर ओव्हर खेळण्यासाठी आलेले केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल यांनी 17 धावा केल्या. (IND vs NZ 4th T20I 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

"बुमराहची सुपर ओव्हरमधील गोलंदाजी पहिली. तो इतका अद्भुत गोलंदाज आहे पण वेगळ्या डिलिव्हरी एंगल तयार करण्यासाठी तो वेगळ्याडिलिव्हरीतयार करण्यासाठी क्रीसचा आणखी थोडासा वापर करू शकतो," मांजरेकर यांनी गुरुवारी ट्विट केले. ट्विटर यूजर्सच्या हे झटपट लक्षात आले आणि चाहत्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. अनेक चाहत्यांनी त्यांना स्वतःचा सल्ला स्वतःकडे ठेवण्यास सांगितले. एका चाहत्याने लिहिले, 'मांजरेकर, तुम्ही कोचपदासाठी अर्ज का करीत नाही? तर दुसरा म्हणाला की, 'प्रत्येक गोलंदाजाचा दिवस चांगला असतो आणि बुधवारी बुमराहचा दिवस खराब होता.'

मांजरेकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा:

याला विश्रांती द्या

बॉलरला तुमच्याकडून सल्ला

तू काय अँगल शिकवतोय

कोचसाठी अर्ज का करत नाही?

त्याचा दिवस नव्हता

असं सर्व असतानाही भारताने सुपर ओव्हर सामन्यात विजय मिळवला. रोहित शर्माने अंतिम दोन चेंडूंत मारलेल्या षटकारांसह टीमला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिकाही जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 179 धावा फटकावल्यानंतर न्यूझीलंडकडून केन विल्यमसनने जवळजवळ एकट्याने हा सामना जिंकलेला होता. किवी कर्णधाराने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 48 चेंडूत 95 धावा केल्या. पण त्याचा हा डाव संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसा नव्हता.