न्यूझीलंडमध्ये (New Zealand) आतापर्यंत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून भारतीय संघाने (Indian Team) मालिकेत अपराजित आघाडी मिळविली आहे. मात्र चौथ्या टी-20 मध्येही विजय मिळविणे विराट सेनेचे उद्दीष्ट आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने आघाडी घेतली आहे आणि आता भारतीय संघाचे लक्ष किवींविरुद्ध क्लीन-स्वीप करण्याचा प्रयत्न असेल. आता दोन्ही संघ वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियमवर चौथ्या टी-20 मध्ये आमने-सामने येतील. विशेष म्हणजे या मैदानावर भारताने आतापर्यंत 2 सामने खेळले आणि दोन्हीमध्ये पराभव पत्करावा लागला. (IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित टी-20 सामन्यांसाठी टीम इंडिया बदल करण्याचा विराट कोहली ने दिला इशारा, 'या' खेळाडूंना मिळू शकते स्थान)
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा चौथा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता वेलिंग्टनच्या वेस्टपैक स्टेडियममध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी 12 वाजता होईल. भारत-न्यूझीलंडमधील चौथा टी-20 सामना थेट स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी वर इंग्रजी भाषेत थेट प्रसारित होईल आणि हिंदी भाषेत स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी थेट प्रसारित केला जाईल.
मालिकेचा पहिला सामना ऑकलंडमध्ये झाला, तेथे भारतीय संघाने न्यूझीलंडचा 6 विकेटने पराभव केला. दुसरा सामनाही याच मैदानावर झाला, ज्यामध्ये भारताने 15 चेंडू शिल्लक असताना 7 विकेट्स राखून विजय मिळविला, तर हॅमिल्टन येथे झालेल्या तिसर्या सामन्यात भारताने पहिल्या डावात 179 धावा केल्या आणि यजमानांना समान धावा करता आल्या. सामना बरोबरीत राहिल्यानंतर सुपर ओव्हर खेळण्यात आली त्यानंतर रोहित शर्माने पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकत भारताला मालिका जिंकवून दिली. भारताने आता न्यूझीलंडच्या धरतीवर खेळत पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. आणि आता आजच्या सामन्यात विजय मिळवत क्लीन-स्वीपच्या दिशेने चाटचाल सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतील.
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विल्यमसन (कॅप्टन), टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, स्कॉट कुग्गेलैन, हमीश बेनेट.