न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टनमधील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारताला न्यूझीलंडने पहिल्या डावात घेतलेल्या 183 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात 191 धावत करता आल्या. भारताने न्यूझीलंडसमोर जिंकण्यासाठी केवळ 9 धावांचे लक्ष्य दिले जे यजमान टीमने एकही विकेट न गमावता 1.4 ओव्हरमध्ये गाठले. न्यूझीलंडचा हा ऐतिहासिक विजय ठरला. न्यूझीलंड क्रिकेटच्या टेस्ट कारकिर्दीतील 100 वा विजय आहे. न्यूझीलंडकडून टिम साऊथी 5, ट्रेंट बोल्ट 4 आणि कॉलिन डी ग्रैंडहोमने 1 गडी बाद केला. साऊथीने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडिया पहिल्या डावात 165 धावांवर ऑलआऊट झाली. (IND vs NZ 1st Test: विराट कोहली ने मोडला सौरव गांगुली चा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांमध्ये 'या' टेस्ट यादीत मिळवले 6 वे स्थान)
चौथ्या दिवसाच्या पहिल्या तासात भारतीय संघाने तीन गडी गमावले. दुसऱ्या डावात भारताकडून मयंक अग्रवालने 58, अजिंक्य रहाणे 29 रिषभ पंतने 25 धावा केल्या. भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपयशी ठरली. पृथ्वी शॉ 14, चेतेश्वर पुजारा 11 आणि कर्णधार विराट कोहली 19 धावा करून आऊट झाले. दुसऱ्या डावात मधल्या फळीनेही निराश केले. या सामन्यात भारताकडून केवळ मयंकने अर्धशतक ठोकले.
या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात त्यांना फक्त 165 धावाच करता आल्या. भारताचे आघाडीचे फलंदाज दोन्ही डावात फेल ठरले. रहाणेने पहिल्या डावात 46 धावा केल्या होत्या. किवी संघाने पहिल्या डावात 348 धावा केल्या. कीवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांच्यात 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. भारताच्या पहिल्या डावाच्या जोरावर किवी संघाला 183 धावांची आघाडी घेतली होती. इशांत शर्मा पाच विकेट्स घेत भारताकडून सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. दुसर्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची (Indian Team) पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली आणि बोल्टच्या तुफानी गोलंदाजीसमोर 113 धावांवर चार विकेट गमावल्या. भारताकडून मयंकने दुसर्या डावात 58 धावा केल्या. या विजयसह भारताला आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. गुणतालिकेत भारताने 360 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहेत, तर किवी टीमने 6 सामन्यात 2 विजयासह 120 गुण मिळवले आहेत.