वेलिंग्टनमध्ये भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना 165 धावा केल्या. संघासाठी पहिल्या डावात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने सात चेंडूंचा सामना करत केवळ दोन धावा केल्या. दुसरियाकडे, यजमान न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचे तर यजमानांनी पहिल्या डावात 348 धावा केल्या. दुसऱ्या डावात बातमी लिहिण्यापर्यंत भारताणें 37 ओव्हरनंतर दोन विकेट गमावून 96 धावा केल्या. सध्या मयंक अग्रवाल आणि विराट कोहली भारताकडून खेळत आहेत. दरम्यान, विराटने या डावात पहिल्या 8 धावा केल्यावर भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना मागे टाकत भारतीय फलंदाजांच्या टेस्ट क्रिकेटच्या यादीत पाचवे स्थान मिळवले. न्यूझीलंडमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात कोहली छाप पाडण्यात अपयशी ठरला. वेलिंग्टनमध्ये भारत-न्यूझीलंड संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 8 धावा केल्यावर भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना मागे टाकत भारतीय फलंदाजांच्या टेस्ट क्रिकेटच्या यादीत 6 वे स्थान मिळवले. गांगुलीने 7216 धावा केल्या आहेत, तर विराट 7216 धावा करून तो खेळत आहे. (IND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान)
गांगुलीने 113 टेस्ट सामन्यात 7216 धावा केल्या आहेत, तर विराट त्याच्या पुढे निघाला आणि 7216 धावा करून तो खेळत आहे. विराटने यादरम्यान 103 सामन्यात 7214 केलेल्या वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज क्रिस गेललाही पछाडले आहे. विराटच्या पुढे आता 104 सामनात 8586 धावा करणारा वीरेंद्र सहवाग आहे. भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरने 200 टेस्ट सामन्यात सर्वाधिक 15,921, त्यानंतर राहुल द्रविड ने 164 डावात 13,288, सुनील गावस्कर यांनी 10,122 आणि व्हीव्हीस लक्ष्मण यांनी 8781 धावा केल्या आहेत. एकूणच विराट टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 47 व्या स्थानावर आहे.
So @imVkohli has now surpassed @SGanguly99 in terms of runs scored in Test cricket.#INDvNZ #TeamIndia #NZvIND pic.twitter.com/iI1MGCRfHY
— Aditya Saha (@adityakumar480) February 23, 2020
वेलिंग्टनमध्ये तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाच्या काही वेळापूर्वी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला पहिल्या डावात 348 धावांवर ऑलआऊट केले. पहिल्या डावाच्या आधारावर यजमान किवी टीमने भारतावर 183 धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma) ने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 3, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. तिसऱ्या दिवशी कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) 43 आणि काइल जैमीसन (Kyle Jamieson) ने 44 धावा केल्या.