मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty)

मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध शुक्रवारपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात टिकून राहणारा दुसरा भारतीय सलामी फलंदाज ठरला. त्याने 1990 मध्ये मनोज प्रभाकरने (Manoj Prabhakar) केलेल्या कामगिरीचे अनुकरण केले. मयंक न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 34 धावा करून आऊट झाला, पण त्यापूर्वी ताणें प्रभाकरच्या एका खास रेकॉर्डची बरोबरी केली. अग्रवालने वेलिंग्टनमधील ब्लॅक कॅप्सविरुध्द सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या संपूर्ण पहिल्या सत्रात फलंदाजी केली. नेपियर (Napier) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रभाकर पहिला सलामी फलंदाज होता. त्याने भारताच्या पहिल्या डावात 268 चेंडूत 95 धावा फटकाविल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 178/1 धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला. पहिला आणि 5 व्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. (IND vs NZ 1st Test Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे संपला, अजिंक्य रहाणे-रिषभ पंत चा धावांसाठी संघर्ष)

शुक्रवारी पृथ्वी शॉसह सलामीला आलेल्या मयंकने स्विंग आणि वारा हे फलंदाजांच्या प्रमुख शत्रूंसमोर पहिल्या सत्रात यशस्वीपणे फलंदाजी केली. पृथ्वी, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली सारखे फलंदाज संघर्ष करत स्वस्तात बाद झाल्यावरही मयंकने धीर सोडला नाही आणि सावध फलंदाजी केली. पहिला ब्रेकपूर्वी त्याने अजिंक्य रहाणे च्या साथीने 61 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. पण, सुरुवात चांगली करूनही त्याला ती कायम ठेवता आली नाही आणि ट्रेंट बोल्टच्या काईल जैमीसनकडे 84 चेंडूत 34 धावा करून कॅच आऊट झाला.

त्यानंतर पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर घोषित करण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. रहाणे आणि रिषभ पंत अनुक्रमे नाबाद 38 आणि 10 धावा करून क्रीजवर खेळत आहेत. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी सांगितले. आणि गोलंदाजांनी परिस्थितींचा पुरेपूर वापर केला आणि मयंक आणि रहाणेने थोडीशी लवचिकता दाखविण्याआधी भारताची स्थिती 40 धावांवर 3 बाद अशी केली.