IND vs NZ 1st Test Day 1: पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे संपला; अजिंक्य रहाणे-रिषभ पंत चा धावांसाठी संघर्ष, कोहली-पुजारा फेल
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) -न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आहे. चहाच्या घोषणेनंतर पावसाला सुरुवात झाली, पण काही केल्या पाऊस न थांबल्याने पहिला दिवसाचा खेळ वेळेआधीच संपवण्यात आला आहे. भारताने 122 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) भारतासाठी खेळत आहेत. रहाणे नाबाद 38 आणि रहाणे 10 धावा करून खेळत आहेत. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 34 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रेंट बोल्टने त्याला काईल जैमीसनकडे कॅच आऊट केले. कर्णधार विराट कोहली 2 धावा काढून बाद झाला. डेब्यू सामना खेळणाऱ्या जैमीसनने त्याला रॉस टेलरकडे स्लिपमध्ये कॅच आऊट केले. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताला पहिले फलंदाजी करावी लागली. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 55 ओव्हरचा खेळ झाला. (Ke Ghungroo Toot Gaye! विराट कोहली च्या व्हायरल फोटोवर श्रेयस अय्यर ने दिलेली प्रतिक्रिया पाहून होईल हसू अनावर)

सामन्याच्या पहिल्या दिवशी चहाच्या वेळेनंतर पावसामुळे खेळ सुरू होऊ शकला नाही आणि पाऊस पडल्यानंतर मैदान खूप ओले झाले असल्याने पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपविण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत शनिवारी पहाटे दुसर्‍या दिवसाचा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता सुरू होईल.

प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 5 व्या ओव्हरमध्ये पहिला धक्का बसला. 18 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा करणार्‍या पृथ्वी शॉ ला टीम साऊथीने बोल्ड केले. त्यानंतर विकेट पाडण्याचे सत्र सुरूच राहिले. जैमीसनने टेस्ट क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. त्याने चेतेश्वर पुजाराला विकेटकीपर बीजे वॉटलिंगकडे कॅच आऊट केले. कर्णधार कोहलीने 7 चेंडूत 2 धावा फटकावून टेलरला आपला झेल दिला.जैमीसनने विराटला माघारी धाडत किवी संघाला मोठे यश मिळवून दिले. दुपारच्या जेवणानंतर भारतीय संघाला चौथा धक्का बसला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करणाऱ्या मयंकने 34 धावा केल्या आणि बोल्टच्या चेंडूवर बाद झाला. हनुमा विहारीच्या रूपात भारताला पाचवा धक्का बसला. विहारीने 20 चेंडूंमध्ये 7 धावा करून जैमीसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.