क्रिकेटच्या खेळात 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा भारतीय फलंदाज राहुल द्रविडचा (Rahul Dravid) खेळ अजूनही त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आहे. आजही कसोटी सामन्यादरम्यान विश्लेषक आणि टीकाकार त्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीत. द्रविडने खेळलेले सर्वच डाव संस्मरणीय असणार आहेत. टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या आजचा खेळ पाहून त्याच्यात द्रविडची छवीच पाहायाला मिळाली. सध्या टीम इंडिया (India)न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर आहे. टी-20 आणि वनडे मालिकेनंतर दोन्ही टीममध्ये आजपासून दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि हिरव्या खेळपट्टीवर पहिले गोलंदाजी करण्याचा निणर्य घेतला. गोलंदाजांनी आजच्या स्थितीचा चांगला फायदा केला आणि भारतीय फलंदाजांना संघर्ष करायला लावला. वेगवान किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज निरुत्तर दिसले. 40 धावांवर 3 मोठ्या विकेट्स गमावल्यावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे ने भारताचा डाव सावरला. एका टोकाला विकेट पडत असताना रहाणेने शांत चित्ताने खेळ केला. (IND vs NZ 1st Test: वेलिंग्टन टेस्टमध्ये मयंक अग्रवाल ने टीम इंडियासाठी केले मनोज प्रभाकर च्या 30 वर्षीय जुन्या अनोख्या कामगिरीचे अनुकरण)
अजिंक्य आणि द्रविडच्या खेळण्याच्या स्टाईलमध्ये अनेकदा तुलना केली गेली. आणि सध्या सोशल मीडियावरही असंच काहीसं सुरु आहे. एका ट्विटर यूजरने द्रविडचा एक जुना व्हिडिओ शेअर केल्या ज्यात वेगवान किवी गोलंदाज शेन बॉन्डच्या घातक गोलंदाजीविरुद्ध कसा खेळत आहे हे दिसत आहे. हा व्हिडिओ भारताच्या 2002 मधील न्यूझीलंड दौऱ्याचा आहे. पाहा:
#Rahane playing a Dravidesque innings. Here’s how Dravid dealt with Bond in 2002: #NZvIND #NZvsIND pic.twitter.com/miDtWtuBuo
— Frank Iyer (@FranklinnnMJ) February 21, 2020
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी किवी टीमने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजी करण्यासाठी बोलावले. पहिल्या दिवशी पावसाने अखेरच्या सत्रात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे 55 ओव्हरचा खेळ झाला. ज्यात भारताने 5 विकेट गमावून 122 धावा केल्या. न्यूझीलंडकडून टेस्ट डेब्यू करणाऱ्या काईल जैमीसन ने सर्वाधिक तीन गडी बाद केले, ज्यात कर्णधार विराट कोहली च्या विकेटचाही समावेश होता.