टीम इंडिया (India) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये खेळला जात आहे. सामन्यात टॉस गमवून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने श्रेयस अय्यर याचे शतक, केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर किवी संघासमोर 348 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले, तर राहुलने 7 वे अर्धशतक पूर्ण केले.अखेरच्या काही ओव्हरमध्ये राहुल आणि केदार जाधव यांनी किवी गोलंदाजांची क्लास घेतली, विशेषतः टिम साउथी याची. साऊथीने त्याच्या 10 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या पण सर्वाधिक 85 धावा लुटवल्या. इतकाच नाही तर साऊथीने त्याच्या शेवटच्या चार ओव्हरमध्ये 56 धावा दिल्या. (IND vs NZ 1st ODI: श्रेयस अय्यर-केएल राहुल यांची तुफानी फलंदाजी, टीम इंडियाचे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचे लक्ष्य)
भारतीय डावाच्या अखेरीस श्रेयसने 103 आणि राहुलने नाबाद 88 धावा केल्या. या दरम्यान राहुलने जिमी निशाम याला मारलेला एक षटकार सध्या चर्चेत आला आहे जो पाहून सर्व जण अवाक राहिले. राहुलने आपला सर्वोत्तम फॉर्म चालू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. राहुलच्या स्फोटक डावामध्ये 6 षटकारांचा समावेश होता. त्यातील एक त्याने विचित्र रिव्हर्स स्वीपने थर्ड मॅनच्या दिशेने षटकार ठोकला. जेम्स निशामने फेकलेल्या 48 व्या षटकात राहुलने रिव्हर्स स्वीपचा वापर करून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. बॉल सहज चौकाराच्या वरून षटकारासाठी गेला आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. पाहा हा व्हिडिओ:
FREAKISH! pic.twitter.com/NlfUGXdDcD
— Divyanshu (@MSDivyanshu) February 5, 2020
न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या डावाची सुरुवात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी केली. दोघे लवकर बाद झाले तरी कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर श्रेयसने शतकी खेळी केली. शिवाय, राहुलनेही अर्धशतक केलं. निशामने 17 व्या ओव्हरमध्ये श्रेयसला जीवगान दिलं ज्याचा लाभ अय्यरने उठवला आणि पाहिलं वनडे शतक साजरं केलं. किवींकडून टिम साउथी 2, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.