श्रेयस अय्यर-केएल राहुल Photo Credit: Twitter/ICC)

टी-20 मालिकेनंतर भारत (India) आणि न्यूझीलंडमध्ये (New Zealand) 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना हॅमिल्टनमध्ये (Hamilton) खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाचा कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा प्रकारे भारताने पहिले फलंदाजी केली आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 347 धावा केल्या आणि यजमान संघाला पहिला वनडे जिंकण्यासाठी 348 धावांचे लक्ष्य दिले. पहिले फलंदाजी करत टीम इंडियासाठी चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने शतकी कामगिरी केली. श्रेयस वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक करत 103 धावांवर आऊट झाला. याशिवाय, केएल राहुल (KL Rahul) याने 88 आणि विराट कोहली (Virat Kohli) याने 51 धावा केल्या. राहुलने 7 वे वनडे अर्धशतक लगावले.  दुसरीकडे, किवींकडून टिम साउथी (Tim Southee) 2,कॉलिन डी ग्रैंडहोम आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (IND vs NZ 1st ODI: पृथ्वी शॉ-मयंक अग्रवाल च्या जोडीचे न्यूझीलंडविरुद्ध डेब्यू, 44 वर्षानंतर घडला असा योगायोग, वाचा सविस्तर)

पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. हे दोन्ही फलंदाज आपले पहिला वनडे सामना खेळत आहेत. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी झाली असताना पृथ्वी 20 धावांवर बाद झाला. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये मयंक 32 धावा करून कॅच आऊट झाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 58 वे अर्धशतक झळकावले. त्याने 61 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. मात्र, 51 च्या वैयक्तिक धावांवर ईश सोढी ने याला बोल्ड केले. यानंतर श्रेयस आणि राहुलने भारताचा डाव सांभाळला. श्रेयसने आज विराटनंतर राहुलसह शतकी भागीदारी केली. श्रेयसने आपले पहिले वनडे शतक 101 चेंडूंमध्ये पूर्ण केले होते, तर राहुलने अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या विकेटसाठी दोघांमधील 136 भागीदारी झाली. श्रेयस बाद झाल्यावर आलेल्या केदार जाधव (Kedar Jadhav) यानेही काही मोठे शॉट्स मारले आणि 26 धावा करून नाबाद परतला.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत भारताने नवीन सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालसह डावाची सुरुवात केली. शिखर धावा आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दोंघांना पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, दोघे संधीचा चांगला उपयोग करू शकले नाही आणि स्वस्तात बाद झाले.