ईश सोढी, विराट कोहली (Photo Credit: Twitter)

बुधवारी न्यूझीलंड (New Zealand0 विरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli_ याने 58 वे अर्धशतक झळकावले. कोहलीचे न्यूझीलंडविरुद्ध हे आठवे अर्धशतक आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात टीम इंदाईकडून आज नवीन जोडीने डावाची सुरूवात केली. शिखर धवन आणि रोहित शर्माना दुखापत झाल्याने पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करत डावाची सुरुवात केली. यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आणि संघाच्या मोठया धावसंख्येत अर्धशतकी योगदान दिले. श्रेयस आणि विराटमध्ये 109 धावांची भागीदारी झाली. मात्र, दोघे मोठा स्कोर करण्याच्या प्रयत्नात असताना ईश सोढी ने भारतीय कर्णधाराला अप्रतिम गुगली टाकत बोल्ड केले जे पाहून खुद्द विराटही चक्रावला. (IND vs NZ 1st ODI: केएल राहुल याने न्यूझीलंडविरुद्ध ठोकलेला षटकार पाहून सर्वच राहिले अवाक्, पाहा Video)

29 वी ओव्हर यजमान किवी संघासाठी महत्वाची ठरली. सोढीकडून बाद होत विराटला पुन्हा एकदा गेल्या अनेक वर्षांत लेगस्पिनविरूद्ध संघर्ष करावा लागत असल्याचे सिद्ध झाले. सोढीने जी गुगली टाकली विराटच्या बॅट आणि पॅडमधून वाट काढत विकेटकीपरच्या दिशेने गेली. विराट काही काळ खुद्द चकित झालेला दिसला. विराटने 63 चेंडूंचा सामना करत 51 धावा केल्या. पाहा हा व्हिडिओ:

मागील चार वनडे सामन्यात कोहलीला लेगस्पिनरने तीन वेळा बाद केले आहे. विराटविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झांपा सर्वात यशस्वी सिद्ध झाला आहे.झांपाने मागील तीन सामन्यांमध्ये दोनदा कोहलीला बाद केले आहे. कोहलीला बाद करूनही किवींविरुद्ध टीम इंडियाने 347 धावा केल्या. श्रेयस अय्यर103 आणि केएल राहुल नाबाद 88 धावांचा डाव खेळत सर्वाधिक नुकसान केले.