![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/01/IND-NZ-2020-T20I-1-380x214.jpg)
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्क (Seddan park) येथे खेळला जाईल. तत्पूर्वी टीम इंडियाने पाच सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन-स्वीप केला होता. टी-20 मालिकेतील क्लीन स्वीपनंतर आता भारतीय संघाला (Indian Team) वनडे मालिकेतही किवींवर वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करेल. सलामी फलंदाज रोहित शर्मा जखमी झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध पहिले वनडे सामना खेळण्यास सज्ज असलेल्या पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांसाठी भारतीय संघाने दरवाजे उघडले. कर्णधार विराट कोहलीने सामन्याआधी हे स्पष्ट केले की पृथ्वी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात मयंकसोबत डावाची सुरुवात करेल, आणि केएल राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल.हॅमिल्टन वनडे सामन्यात दोघांचे आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पादर्पण निश्चित आहे. मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर टीम इंडियाची ही तिसरी वनडे मालिका आहे. (IND vs NZ 1st ODI: न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, विराट कोहली याला 'या' 2 दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडण्याची संधी)
न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार 7:30 सकाळी वाजता हॅमिल्टन, सेडन पार्कमध्ये सुरू होईल. भारत-न्यूझीलंडमधील पहिला वनडे सामना थेट स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी वर इंग्रजी भाषेत थेट प्रसारित होईल आणि हिंदी भाषेत स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी थेट प्रसारित केला जाईल.
विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. अखेरच्या भारत आणि न्यूझीलंडचा वनडे सामन्यात किवी संघाने मँचेस्टरमध्ये विश्वचषक सेमीफायनल सामन्यात भारताला 18 धावांनी पराभूत करत स्पर्धे बाहेर केले होते. दरम्यान, या मालिकेआधी यजमान संघाला मोठा धक्का असला आहे. त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसनला दुखापतीमुळे पहिल्या दोन्ही सामन्यांना मुकावे लागणार असून, टॉम लाथम संघाचे नेतृत्व करेल.
भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर.
न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.