मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध (England) सध्याच्या कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची  (Mohammed Siraj) जादू सर्वत्र पसरली आहे. मालिकेत आतापर्यंत दोन सामने झाले आहेत, ज्यात त्याने इंग्लिश फलंदाजांना प्रचंड त्रास देत 11 विकेट्स काढले आहेत. सिराजला त्याच्या कामगिरीने क्रिकेट जगतातील महान खेळाडूंकडून प्रशंसा मिळवली आहे. सिराजचे कौतुक करणाऱ्यांमध्ये आता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हर्मिसनचे (Steve Harmison) नावही सामील झाले आहे. त्याने सिराजची स्तुती केली आणि म्हणाला, ‘तो भारतीय वेगवान हल्ल्याच्या ड्युरासेल बॅटरीसारखा आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा त्याला गोलंदाजी करण्यास सांगतो तेव्हा तो त्याच्या 100% क्षमतेने गोलंदाजी करतो.’ लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात टीम इंडियाने (Team India) अष्टपैलू खेळी करत इंग्लिश संघाला 151 धावानी पराभूत केले व पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. (IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीत इंग्लंड उतरवणार तगड्या खेळाडूंची फौज, पाहा जो रूटच्या ब्रिटिश सेनेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

ESPNCricinfo शी बोलताना हर्मिसन म्हणाले, “फिटनेस प्रशिक्षक त्याच्यासोबत जे करत आहेत ते करत रहा. या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यापर्यंत त्याने अशीच गोलंदाजी करत राहावी अशी माझी इच्छा आहे.” स्टीव्ह हर्मिसन म्हणाले की, मोहम्मद सिराज ही ड्युरसेल बॅटरी आहे. मी पहिल्यापासून शेवटच्या चेंडूपर्यंत बोलत आहे, तो खूप उत्साही दिसत होता. हर्मिसन पुढे म्हणाले की, “मला वाटते की त्याच्यासाठी स्वतःचेही हृदय आहे, जे त्याला फलंदाजाकडे नेण्यास नेहमीच मदत करते. तो नेहमी फलंदाजाला सांगतो की ही तुझी आणि माझी लढत आहे. जर फलंदाज या सामन्यासाठी तयार नसेल, तर विजय सिराजकडे जातो. या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सर्वात मोठा फरक समान होता. तो ज्या प्रकारे धावतो, तो छान आहे.” लॉर्ड्स कसोटीत सिराजने शानदार गोलंदाजी करत दोन्ही डावांमध्ये एकूण 8 विकेट्स काढल्या. भारताच्या ऐतिहासिक विजयात त्याच्या शानदार गोलंदाजीचे मोठे योगदान राहिले.

दरम्यान, या मालिकेचा तिसरा सामना 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यातही टीम इंडियाला मोहम्मद सिराजकडून मोठ्या अपेक्षा असतील. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायच्या निर्धारित असेल. दुसरीकडे, यजमान ब्रिटिश संघ मालिकेत पुनरागम करण्याच्या निर्धारित असेल. पहिल्या सामन्यात पाऊस जो रूटच्या इंग्लिश संघाच्या मदतीला धावला तर लॉर्ड्सवर हातातील सामना त्यांनी गमावला. अशास्थितीत त्यांचे लक्ष मालिका बरोबरीत करण्याकडे असेल.