IND vs ENG 4th Test: इंग्लंडच्या मालिका विजयात ‘हा’ भारतीय ठरणार हुकमी एक्का; चौथ्या कसोटीपूर्वी Joe Root ने केला दावा, गोलंदाजांनी काढला तोडगा
जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. ओव्हल  (Oval Test) मैदानावरील सामन्यापूर्वी लीड्समध्ये यजमान इंग्लंडने भारतीय संघावर (Indian Team) दणदणीत विजय मिळवला होता. या विजयासह इंग्लिश संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारतीय कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट या दौऱ्यावर शांत राहिली आहे आणि यासाठी इंग्लंड कर्णधार जो रूटने (Joe Root) त्याच्या गोलंदाजांचे कौतुक केले. आता मालिकेत फक्त दोन सामने शिल्लक आहेत आणि दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची संधी आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रूटने मालिका जिंकण्याबाबत मोठे विधान केले आणि सांगितले आहे की आपल्या संघाला मालिका काबीज करण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत राहणे गरजेचे आहे. (England's 4th Test, Predicted Playing XI: ओव्हल कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात ‘हे’ दोन मोठे उलटफेर, कोण होणार आऊट?)

मंगळवारी प्री-मॅच व्हर्च्युअल प्रेसरला संबोधित करताना एएनआयने उद्धृत केल्याप्रमाणे रूट म्हणाला की, “आमच्या गोलंदाजी हल्ल्याला श्रेय देण्याची गरज आहे. विराट कोहली जागतिक दर्जाचा फलंदाज आहे म्हणूनच हे सर्व श्रेय गोलंदाजी गटालाच द्यायला हवे. आम्ही त्यांना आतापर्यंत शांत ठेवण्यात यशस्वी झालो आहोत आणि आमच्या गोलंदाजी गटाकडून हा एक अद्भुत प्रयत्न आहे. मालिका जिंकायची असेल तर आम्हाला हे करत राहावे लागेल. आम्ही त्याला आऊट करण्याचा मार्ग शोधला, तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याने यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या खेळाडूंना कसे बाहेर काढायचे हे आपण ठरवले पाहिजे.” त्याने पुढे म्हटले, “नक्कीच, विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतासारखी जागतिक दर्जाची बाजू, मला प्रतिसादापेक्षा कमी काहीही अपेक्षित नाही. आम्ही अन्यथा विचार करण्यास भोळे आहोत, हे महत्त्वाचे आहे की आपण भ्रमात पडू नये. आम्ही स्तरीय खेळण्याच्या मैदानावर पोहोचलो आहोत, आम्हाला आता अधिक मेहनत करावी लागेल. जर आपण कोणत्याही टप्प्यावर खेळापेक्षा पुढे गेलो तर आपल्याला एकत्रीकरण करावे लागेल.”

लीड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी 215/2 वरून खेळण्यास पुन्हा सुरू केल्यानंतर टीम इंडियाकडून उल्लेखनीय पुनरागमन सुरु ठेवण्याची अपेक्षा होती.  तथापि, इंग्लंडच्या गोलंदाजांनी सर्व फलंदाजानाचा भडका उडवला आणि सुरुवातीच्या सत्रातच खेळ गुंडाळला व पाहुण्या संघाला 278 धावांवर गुंडाळले. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर सध्या सुरु असलेल्या मालिकेत कोहलीने आतापर्यंत फक्त एक अर्धशतक झळकावले आहे आणि इंग्लिश संघाचा अनुभवी ज्येष्ठ गोलंदाज जेम्स अँडरसन त्याला दोनदा बाद करण्यात यशस्वी झाला आहे.