IND vs ENG 4th Test Day 2 Live Streaming: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आज चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लड फलंदाजांनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घातलं आणि संपूर्ण संघ 205 धावांवरच गारद झाला. अक्षर पटेल (Axar Patel), मोहम्मद सिराज आणि अश्विनच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंड संघ टिकाव धरू शकला नाही व पहिल्या डावात दोनशे पार धावाच करू शकला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी टीम इंडिया 1 बाद 24 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. शुभमन गिल पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या जोडीवर संघाला आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असेल. भारत आणि इंग्लंड संघातील दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात. तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असणार आहे. (IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाचा भेदक मारा; बेन स्टोक्सची एकाकी झुंज, इंग्लंड पहिल्या डावात 205 धावांवर ऑलआऊट)
दरम्यान, पहिल्या दिवशी इंग्लिश संघाने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली, मात्र संघ पुन्हा एकदा आश्वासक सुरुवात करण्यात फेल झाला. बेन स्टोक्स (Ben Stokes) वगळता एकाही खेळाडूला जम बसवता आला नाही तर भारताकडून अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या फिरकीत इंग्लिश फलंदाजांना अडकवले आणि सर्वाधिक 4 गडी बाद केले. दुसरीकडे, यजमान भारतीय संघाचीही सुरूवात निराशाजनक झाली. शून्य धावसंख्या असतानाच शुभमन गिल बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडिया पहिल्या डावात इंग्लंड अद्याप 181 धावांनी पिछाडीवर आहे.
पहा भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जॅक लीच, डोमिनिक बेस आणि जेम्स अँडरसन.