IND vs ENG 4th Test Day 1: टीम इंडियाचा भेदक मारा; बेन स्टोक्सची एकाकी झुंज, इंग्लंड पहिल्या डावात 205 धावांवर ऑलआऊट
बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने (England) पहिल्या डावात 205 धावा केल्या. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश संघाकडून स्टोक्स आणि बेन फोक्सने (Ben Foakes) सर्वाधिक धावा केल्या. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात स्टोक्सने 121 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासह 55 धावांची खेळी केली तर फोक्सने 46 धावा केल्या. जेम्स अँडरसन 10 धावा करून नाबाद परतला. संघ अडचणीत असताना स्टोक्सने भारतीय गोलंदाजांचा संयमीपणे सामना केला आणि मालिकेत पहिले अर्धशतक ठोकले. याशिवाय, ऑली पोपने 29 धावा आणि जॉनी बेयरस्टोने 28 धावांचे योगदान दिले तर आघाडीचे अन्य फलंदाज एकेरी धावसंख्येत बाद झाले. दुसरीकडे, यजमान टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संघर्ष करताना दिसले. अक्षर पटेलला (Axar Patel) 4 विकेट तर रविचंद्रन अश्विनला 3 विकेट, मोहम्मद सिराजला 2 मिळाल्या. वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 4th Test 2021: मोहम्मद सिराज विकेट घेतो तेव्हा नेहमी मैदानातच का असतो Mayank Agarwal? भारतीय ओपनरबाबत Netizens ना पडला प्रश्न, पहा Tweets)

दिवसाच्या सुरुवातील टॉस जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला पण तो पूर्णपणे चुकीचा चुकीचा ठरवत पहिल्या दिवशी आपला दबदबा कायम ठेवला. दिवसाच्या पहिल्या सत्रातच पटेलने इंग्लंडची सलामी जोडी मोडली. त्यानंतर मोहम्मद सिराजने जो रुटची महत्त्वपुर्ण विकेट काढली. पुढे जॉनी बेअरस्टो आणि स्टोक्सने डाव सांभाळला. मात्र, सिराजने जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स ही सेट जोडी फोडली व बेअरस्टोला 28 धावांवर पायचित केलं. बेयरस्टोने 28 धावांची खेळी केली. यानंतर, ओली पोप आणि स्टोक्सने संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. स्टोक्स आणि बेअरस्टोमध्ये चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. स्टोक्सने चौकारासह झुंजार अर्धशतक पूर्ण केलं. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळीनंतर स्टोक्सला एलबीडब्लयू आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं.

तिसऱ्या सत्राच्या आधीच 5 विकेट्स गमावल्यानंतर पोप आणि डॅन लॉरेन्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला व 6व्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली. पण अखेर अश्विनने ओली पोपला शुबमन गिलकडे झेलबाद केले. यानंतर अश्विनने 66व्या ओव्हरमध्ये बेन फोक्सला बाद केले आणि इंग्लंडला 7वा धक्का दिला. फोक्स केवळ 1 धाव करुन बाद झाला. पटेलने लॉरेन्सला 46 धावांवर रिषभ पंतकडे स्टम्प आऊट केलं. डोम बेस 16 चेंडूत 3 धाव करून पटेलचा शिकार बनला. अश्विनच्य चेंडूवर चौकार खेचत जॅक लीचने संघाची धावसंख्या दोनशे पार नेली. सध्याच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतरच्या पुढील 2 सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली.