IND vs ENG 4th Test Day 1: Ben Stokes याचे झुंझार अर्धशतक, Tea ब्रेकपर्यंत इंग्लंड 144/5
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात चौथा कसोटी सामना सुरू झाला आहे. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडकडून बेन स्टोक्सने (Ben Stokes) वर्चस्व गाजवलं आणि झुंजार अर्धशतक ठोकले. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत इंग्लिश टीमने पहिले फलंदाजी करत 144 धावांवर 5 विकेट गमावल्या आहे. चहापानची घोषणा झाली तेव्हा ओली पोप (Olie Pope) 21 धावा आणि डॅन लॉरेन्स (Dan Lawrence) 15 धावा करून खेळत होते. यजमान टीम इंडियाकडून दुसऱ्या सत्रात मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. या सत्रात स्टोक्सच्या रूपात इंग्लिश संघाला मोठा धक्का बसला. स्टोक्स 55 तर जॉनी बेअरस्टो 28 धावा करून परतला. यापूर्वी, पहिल्या सत्रात अक्षर पटेलने पहिल्या सत्रात दोन विकेट घेतल्या तर सिराजला इंग्लंड कर्णधार जो रूटच्या रूपात एक विकेट मिळाली होती. आजपासून सुरु झालेल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला होता. (IND vs ENG 4th Test Day 1: Rishabh Pant याच्याकडून Zak Crawley विकेटमागून स्लेज, इंग्लंडच्या फलंदाजाला भोवली चूक, पहा भन्नाट Video)

पहिले फलंदाजी करत आघाडीचे 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर बेअरस्टो आणि स्टोक्ससोबत मिळून संघाचा डाव पुढे नेला. दोघांनी बचावात्मक फलंदाजी करताना मैदानावर स्थिरावले होते. अशात सिराजने डावातील 29व्या ओव्हरच्या पहिल्याच पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोला पायचित केले. बेअरस्टोने 67 चेंडूत 28 धावा केल्या. यासह सिराजने स्टोक्स आणि बेअरस्टो यांच्यातील 48 धावांची भागीदारी मोडली. यादरम्यान, स्टोक्सने चौकारासह झुंजार अर्धशतक पूर्ण केलं आणि इंग्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडने 4 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या. ओली पोपने चोकार खेचत संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. स्टोक्सने 121 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासह 55 धावांची खेळी केली. यापूर्वी, टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांवर वरचढ ठरले. गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडला बांधून ठेवलं आणि पाहुण्या संघाने 100 धावांच्या आत आघाडीचे 4 फलंदाजांची विकेट गमावली.

अक्षर पटेलने डावातील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडला पहिला धक्का दिला आणि सलामी फलंदाज डोम सिब्लीला त्रिफळाचीत केले. यांनतर, सिराजने दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंड कर्णधार जो रुटच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. रूट अवघ्या 9 चेंडूत 5 धावा करत रूट पव्हेलियनला परतला. झॅक क्रॉली देखील 9 धावा करून बाद झाला.