IND vs ENG 4th Test Day 1: Rishabh Pant याच्याकडून Zak Crawley विकेटमागून स्लेज, इंग्लंडच्या फलंदाजाला भोवली चूक, पहा भन्नाट Video

IND vs ENG 4th Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून परंतु हा निर्णय मोठ्या प्रमाणात चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. टीम इंडियाने लवकरच इंग्लंडची तीन विकेट काढल्या. गोलंदाजीला आलेल्या लोकल बॉय अक्षर पटेलने सर्वप्रथम डोम सिब्लीला (Dom Sibley) बोल्ड केले तर त्यानंतर झॅक क्रॉलीचीही (Zak Crawley) शिकार केली. क्रॉलीची विकेट टीम इंडियासाठी सर्वात खास होती, कारण विकेटच्या मागून रिषभ पंतने (Rishabh Pant) विकेटच्या मागून क्रॉलीला डिचवलं ज्यामुळे इंग्लिश फलंदाजाने प्रेरित होत पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डावातील 8व्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली. (IND vs ENG 4th Test Day 1: मोहम्मद सिराजने डिचवलं, विराट कोहली-बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर झाला जोरदार वाद, अंपायरना करावा लागला हस्तक्षेप)

इंग्लंडने 1 विकेट गमावून 15 धावा केल्या होत्या. झॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर उपस्थित होते. पटेल गोलंदाजीला आला. तिसर्‍या चेंडूवर झॅकने बचाव केला.त्यानंतर, विकेटच्या मागून पंत म्हणाला, “कोणाला तरी राग येतोय, कोणाला तरी राग येतोय”! यानंतर, झॅकने पटेलच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयन्त केला, पण चेंडू थेट हवेत उडाला आणि सर्कलच्या आत मोहम्मद सिराजने झेल पकडत इंग्लंड ओपनरला पॅव्हिलियनमध्ये परतण्यास भाग पडले.

यापूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून अहमदाबादमध्ये फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करत प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केला. वैयक्तिक कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुमराहची रजा मंजूर केली आहे. दुसरीकडे इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांना बाहेर करत डॅन लॉरेन्स व डोम बेस यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. दोन दिवसांत संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विजयानंतर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा आहे. सामन्यात विजय किंवा ड्रॉ संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट निश्चित करेल.