IND vs ENG 4th Test 2021: Rishabh Pant याची जिम्नॅस्ट स्टाईल उडी पाहून Virat Kohli ही झाला हैराण, दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)
रिषभ पंतच्या किक-अपने विराट कोहली हैराण (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 4th Test 2021: भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या क्रिकेट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पंत केवळ चांगली फलंदाजीच करत नाही तर त्याची विकेटकीपिंगही भारतीय विकेटवर पाहण्यासारखी आहे. इंग्लंडविरुद्ध (England) त्यांच्या विकेटकिपिंगची संध्या चर्चा रंगली असून त्याची चपळतादेखील पाहायला मिळत आहे. भारत (India)-इंग्लंड संघांमध्ये अहमदाबाद येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही असेच घडले. चौथ्या अहमदबाद टेस्ट (Ahmedabad Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी पंत विकेटच्या मागे खूप सक्रिय दिसला. आपल्या शैलीत तो गोलंदाजांना प्रोत्साहन देत होता. या दरम्यान, इशांत शर्माचा फुल लेंथ बॉल पंतजवळ येताच तो वरच्या दिशेने उडाला, त्यामुळे पंतला चेंडू पकडण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अखेर पंतने चेंडू पकडला मात्र तो खाली पडला. पण, खाली पडल्यानंतर त्याने एका जिम्नॅस्टप्रमाणे उडी मारली आणि उभा राहीला. (IND vs ENG 4th Test Day 1: Rishabh Pant याच्याकडून Zak Crawley विकेटमागून स्लेज, इंग्लंडच्या फलंदाजाला भोवली चूक, पहा भन्नाट Video)

दरम्यान, पंतला अशी उडी मारून उभे राहताना पाहून टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील चकित झाला आणि त्याने हावभावाने या युवा विकेटकीपरची प्रशंसा करताना दिसला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 7व्या ओव्हर दरम्यान हा प्रसंग पाहायला मिळाला. बीसीसीआयने पंतच्या किक-अपचा एक मस्त व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पंतने आपल्या फिटनेस शिवाय आपल्या विकेटकिपिंगने देखील पहिल्या दिवशी चांगलेच प्रभावित केले. इंग्लंडच्या पहिल्या डावात पंतनेही एक स्टंप विकेट मिळवली आणि अक्षर पटेलच्या चेंडूवर डॅन लॉरेन्सला माघारी पाठवले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

गेल्या काही महिन्यांत पंत एक क्रिकेटर म्हणून विकसित झाला आहे. फलंदाजीसह सामने जिंकण्यापासून विकेटच्या मागे जबरदस्त झेल घेण्यापर्यंत त्याने आपल्या प्रत्येक खेळात सुधार केला आहे. मोटेरा येथे सुरु असलेल्या चौथा कसोटी सामन्यात पंत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, पहिल्या दिवशी जो रूटच्या इंग्लिश टीमने पहिले फलंदाजी केली मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे टिकू शकले नाही आणि पहिल्या डावात अवघ्या 205 धावांवर ऑलआऊट झाले. बेन स्टोक्सला वगळता अन्य खेळाडूंना तग धरता आला नाही. स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या तर यजमान टीम इंडियासाठी अक्षर पटेलने 4 विकेट घेतल्या.