IND vs ENG 3rd Test: भारताविरुद्ध लीड्स टेस्ट सामन्यासाठी इंग्लंड करू शकते मोठे बदल, ‘या’ 2 खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग XI मध्ये स्थान
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Likely Playing XI: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून लीड्समध्ये (Leeds) सुरु होणार आहे. तत्पूर्वी, लॉर्ड्सवर 151 धावांच्या फरकाने दुसरी कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने (Indian Team) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अशा स्थितीत इंग्लिश संघावर मालिकेत तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी दबावात असेल. ‘विराटसेने’ने तिसरी कसोटी सामना जिंकला तर त्याला मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेईल. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाला कोणतीही कसर सोडायची असेल. अशा स्थितीत इंग्लंड संघ (England Team) अनेक बदलांसह या सामन्यात उतरणार आहे. एकीकडे लॉर्ड्सवर पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. दुसरीकडे, सलामीवीर डोम सिब्लीला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले आहे. जो रूट संघात काही महत्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहे जे खालीलप्रमाणे आहेत. (India Likely Playing XI 3rd Test: लीड्स टेस्ट सामन्यात टीम इंडिया करणार मोठा फेरबदल, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI)

सिब्ली बाहेर पडल्यानंतर हसीब हमीद (Haseeb Hameed) संघासाठी रोरी बर्न्ससह सलामीला येऊ शकतो. अशा स्थितीत जगातील नंबर वन टी-20 फलंदाज डेविड मलानला (Dawid Malan) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे. कर्णधार जो रूटला आशा आहे की मालन टी-20 क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्ये प्रभाव निर्माण करू शकेल. मात्र, त्याला कसोटी सामन्यांचा फारसा अनुभव नाही. मालनने यापूर्वी इंग्लंडसाठी 15 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 27.84 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 140 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, जखमी होऊन वुड संघाबाहेर बसल्यानंतर साकिब महमूदला (Saqib Mahmood) कसोटी पदार्पणाची संधी मिळणे अपेक्षित आहे. पाकिस्तानी वंशाचा वेगवान गोलंदाज साकिब इंग्लंडसाठी आतापर्यंत 7 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. मार्क वुडच्या दुखापतीने त्याच्यासाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडले आहेत.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली, सॅम कुरन, ओली रॉबिन्सन, साकिब महमूद आणि जेम्स अँडरसन.