टीम इंडिया, नॉटिंगहम टेस्ट (Photo Credit: PTI)

India Likely Playing XI for 3rd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान सुरु असलेली कसोटी मालिका अतिशय रोमांचक वळणावर पोहोचली आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर भारतीय संघ (Indian Team) आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर भारताने लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी दमदार गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी संघाला मोठा विजय मिळवून दिला. लॉर्ड्स टेस्ट सामन्यानंतर टीम इंडिया (Team India) आता लीड्स (Leeds) येथे विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले (Headingley) येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात फिरकीपटूची मदत मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) संघात मोठे फेरबदल करू शकते. (IND vs ENG: टीम इंडिया ‘Fab 4’ च्या कसोटी शतकाची प्रतीक्षा, एकही शतक न करता Virat Kohli पेक्षा कोणी खेळला जास्त डाव जाणून घ्या)

लीड्स कसोटी सामन्यासाठी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान भारताने हा सामना जिंकला, तर ते मालिकेत पुढे जात विजयी आघाडी घेऊ शकतो. दुसरीकडे, इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दरम्यान, कोहली आणि संघाचे लक्ष इंग्लंडमधील त्यांचा रेकॉर्ड सुधारण्याकडे असेल. भारताने गेल्या तीन दौऱ्यांमध्ये - 2011, 2014 आणि 2018 मध्ये इंग्लंडच्या मातीवर एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले नाहीत. तसेच कोहली आणि कंपनी लीड्समध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम ठेवू शकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. 2002 मध्ये हेडिंग्ले, लीड्स येथे दोन्ही संघ अखेर आमनेसामने आले होते तेव्हा भारतीय संघाने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. हेडिंग्ले येथे भारताने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनीं 2 जिंकले, 3 मध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले आहेत. तसेच एक कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. भारताने 1986 आणि 2002 मध्ये लीड्सच्या मैदानात बाजी मारली होती.

लीड्स टेस्ट सामन्यासाठी भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.