IND vs ENG 3rd Test 2021: अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जय्यत तयारी करत आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) दोन्ही संघ मालिकेत पुन्हा एकदा आमने-सामने येतील. सध्या दोन्ही संघातील मालिका 1-1 अशा बरोबरीत असून सिरीज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांना आगामी सर्व सामन्यात विजय मिळवणे गरजेचं आहे. शिवाय, तिसऱ्या सामन्यानंतर या शर्यतीतून बाहेर पडेल याबाबत देखील चित्र स्पष्ट होईल. सध्या भारत (India), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढाई पहाया मिळत आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाला इंग्लंडचा पराभव करून टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरवाजे उघडे ठेवण्याचे मोठे आव्हान आहे पण, त्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागणार आहेत. (IND vs ENG 3rd Test 2021: विराट कोहलीची नजर व्हीव्हीएस लक्ष्मणच्या स्पेशल रेकॉर्डवर, अश्विनही '400 क्लब'च्या उंबरठ्यावर, पहा D/N सामन्यात बनणाऱ्या रेकॉर्डची लिस्ट)
भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा सामना दिवस/रात्र असून यजमान टीम इंडियाला विजयासाठी ही 3 कामे करावी लागतील.
1. पहिले फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणे
या सामन्यात टॉस पुन्हा महत्वाचा ठरणार आहे. नाणेफेक कोणाच्या हाती नाही मात्र, यजमान टीमला जिंकून पहिले फलंदाजी करत मोठा स्कोर करण्याची गरज आहे. पहिले फलंदाजी करत मोठी धावसंख्येचा परिणाम पहिल्या दोन्ही सामन्यात पाहायला मिळाला आहे. दोन्ही सामन्यात पहिले फलंदाजी करत संघाने मोठी धावसंख्या उभारत विरोधी संघावर दबाव आणला आहे. त्यामुळे, पहिले फलंदाजी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यावर भर देण्याची गरज आहे.
2. गोलंदाजांना 20 विकेट्स घ्याव्या लागतील
जर क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांची जादू चालली तर विरोधी संघ पूर्णतः दबावाखाली येतो. सध्या टीम इंडियामध्ये एकापेक्षा जास्त आक्रमक गोलंदाज आहेत जे आपल्या क्षमतेने सामन्याचा निर्णय बदलू शकतात. अशा परिस्थितीत जर भारतीय गोलंदाज इंग्लंडविरुद्ध 20 अचूक चेंडू टाकण्यास यशस्वी झाला तर तिसरा कसोटी सामना जिंकण्यात तो यशस्वी होऊ शकतो. मात्र, जर एकही इंग्लिश फलंदाजाने मोठा स्कोर केला तर, टीम इंडियाच्या बॅकफूटवर पडेल आणि सामना विजयाच्या अपेक्षांचा तिथेच भंग होईल.
3. रोहित शर्मा-शुभमन गिलची आश्वासक सुरुवात
टीम इंडियाच्या सलामीवीरांना संघाला चांगली सुरुवात करता आली तर भारतीय संघ मोठ्या धावसंख्या नक्कीच गाठते असे अलीकडे दिसून आले आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी अहमदाबादमध्ये प्रभावी सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे जेणेकरुन यजमान संघ पाहुण्या संघासमोर मोठी धावसंख्या उभारू शकेल.