रविचंद्रन अश्विन, विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 2: भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) भारताचा (India) माजी क्रिकेटर हरभजन सिंहच्या (Harbhajan Singh) देशात दुसऱ्या सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला आहे. भज्जीचा रेकॉर्ड मोडत एलिट यादीत दुसरे स्थान पटकावण्याची अश्विनने बेन स्टोक्सची (Ben Stokes) विकेट घेतली. यासह आता अश्विनने भारतात कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या सर्वाधिक 619 विकेट घेणाऱ्या माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी देशात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेच्या नावावर भारतात सर्वाधिक 350 विकेट आहेत. शिवाय, 34 वर्षीय अश्विन खेळाच्या या प्रदीर्घ स्वरूपात भारतासाठी 400 विकेट क्लबमध्ये सामील होण्यापासून केवळ 11 विकेट मागे आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध 17 कसोटी सामन्यात 68  घेतल्या आहेत. अश्विनने यापूर्वी, इंग्लंडच्या पहिल्या डावात डोम सिब्लीला 16 धावांवर आणि डॅनियल लॉरेन्स यांना माघारी पाठवलं. (IND v ENG 2nd Test 2021: इंग्लंड संघाची कमाल! टीम इंडियाला दिली नाही एकही Extra धाव, मोडला तब्बल 66 वर्षे जुना वर्ल्ड रेकॉर्ड)

त्याच्या या कामगिरीमुळे भारताला इंग्लंडच्या टॉप-ऑर्डरला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने लंचपर्यंत 4 विकेट्स गमावून 39 धावा केल्या आहेत. लोकल बॉय अश्विनने 2 विकेट्स घेतल्या तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळवल्या. यापूर्वी फलंदाजीच्या कामगिरीनंतर भारताने 329 धावांपर्यंत मजल मारली. रोहित शर्माने दमदार कामगिरी करत सर्वाधिक 161 धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 67 तर रिषभ पंतने नाबाद  58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोनने 3 तसेच जॅक लीचला 2 विकेट मिळाल्या. टीम इंडियाने चेपॉकवर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 6 बाद 300 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली आणि 329 धावांवर पहिला डाव संपुष्टात आला.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या सामन्यातील विजय टीम इंडियाचे यंदा लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या शर्यतीत आव्हान कायम ठेवेल. न्यूझीलंड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे.