IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाच्या (Indian Team) टी-ब्रेकपर्यंत 3 विकेट गमावून धावा केल्या आहेत. चहापानची वेळ झाली तेव्हा रोहित 132 धावा आणि रहाणे 36 धावा करून खेळत होते. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने दमदार सुरुवात करत यजमान भारतीय संघाला तीन झटके दिले. शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर तर चेतेश्वर पुजारा 21 धावा करून परतला. यानंतर दुसऱ्या डावात रोहित-रहाणेच्या जोडीने इंग्लंड गोलंदाजांची धुलाई करत शतकी भागीदारी केली आणि दुसऱ्या सत्राखेर संघाला आणखी कोणता फटका बसू दिला नाही. इंग्लंडकडून ओली स्टोन (Olly Stone), मोईन अली (Moeen Ali) आणि जॅक लीच (Jack Leech) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 2nd Test Day 1: रोहित शर्माचा शतकी धमाका, इंग्लंड गोलंदाजांची धुलाई करत ढोकळे 7वे टेस्ट शतक; मोडले 'हे' रेकॉर्डस्)
हिटमॅन रोहितने 130 चेंडूत झुंजार शतक पूर्ण केले असून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 7वे शतक ठरले. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी रोहितने रहाणेच्या साथीने टीम इंडियाचा डाव सावरला. शून्यावर शुभमन माघारी परतल्यावर रोहितने पुजाराच्या साथीने डावाची सूत्रे हाती घेत 83 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. लीचने पुजाराला बेन स्टोक्सच्या हाती कॅच आऊट करत माघारी धाडलं आणि यजमान संघाला दुसरा झटका दिला. पुजारापाठोपाठ विराट देखील माघारी परतला. कोहली खातेही उघडू शकला नाही आणि पाच चेंडू खेळत शून्यावर माघारी परतला. अशाप्रकारे संघाने 100 धावांच्या आत तीन विकेट गमावल्या. मात्र, संघ अडचणीत असताना रोहित-रहाणेच्या जोडीने संयमी भागीदारी करत टीमला पुढे कोणताही धक्का बसू दिला नाही.
भारत-इंग्लंड मालिकेबद्दल बोलायचे तर जो रूटच्या इंग्लंडने पहिल्या सामन्यात यजमान संघाचा 227 धावांनी पराभव करत मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली. त्यामुळे, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम ठेवणे गरजेचे आहे.