IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडला (England) सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पराभवाची परतफेड करत भारतीय संघाने (Indian Team) चेपॉकच्या (Chepauk) मैदानावर दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी शानदार विजय मिळवला. चार सामन्यांच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा विजय गरजेचा होता. फलंदाज असो किंवा गोलंदाज भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने आपल्या परीने सर्वोत्तम योगदान दिले आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर समाधान आणि विजयाचा आनंद स्पष्ट दिसून आला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात सामन्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हातमिळवणी करताना दिसत आहे. यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील एकमेकांना आलिंगन देताना दिसत आहे. (IND vs ENG 2nd Test 2021: रेकॉर्डब्रेक विराट; टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, कोहलीची 'कॅप्टन कूल' एमएस धोनीच्या या मोठ्या रेकॉर्डशी बरोबरी)
कुलदीप यादवने मोईन अलीला बाद करत इंग्लंडच्या अंतिम फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर, विराटने मोईनची पाठ थोपडत त्याने दिलेल्या लढ्याबद्दल शाबासकी दिली. मोईनने 9व्या स्थानी फलंदाजीला येत 18 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 5 षटकार खेचत वेगवान 43 धावा केल्या, पण अर्धशतकी धावसंख्या पार करण्यापूर्वीच कुलदीपने त्याला विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद केलं. यानंतर, विराटने रोहितला आलिंगन घालत त्याचे विजयासाठी अभिनंदन केले. रोहित आणि विराट यांच्या दुरावा आल्याचे वृत्त मागील काही वर्षांपासून सुरु आहे, मात्र दोन्ही दिग्गज फलंदाजांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले. पहा व्हिडिओ
That winning feeling! 👌👌
Smiles all round as #TeamIndia beat England in the second @Paytm #INDvENG Test at Chepauk to level the series 1-1. 👏👏
Scorecard 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/VS4rituuiQ
— BCCI (@BCCI) February 16, 2021
दरम्यान, दोन्ही संघातील उर्वरित दोन सामने आता अहमदाबादच्या नवनिर्मित मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यानंतर, याच मैदानावर पाच टी-20 सामने खेळले जातील आणि अखेरीस पुणेमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका आयोजित केली जाईल.