IND vs ENG 2nd T20I 2021: इशान किशन, सूर्यकुमार यादव यांच टी-20 डेब्यू; 100 IPL सामन्यानंतर डेब्यू करणारा SKY पहिला क्रिकेटर
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd T20I 2021: इंग्लंड (England) संघाविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून (India) ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. नाणेफेकपूर्वी ईशान आणि सूर्यकुमार यांना पहिले भारतीय कॅप देण्यात आली. रविवारी भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) जोडीने आपल्या डेब्यूसह सर्वांचे लक्ष वेधले. नाणेफेक जिंकल्यानंतर शिखर धवनच्या जागी इशान किशन फलंदाजीची सुरुवात करण्याबाबत कर्णधार विराट कोहलीने पुष्टी केली. दरम्यान, दुसर्‍या टी-20 सामन्यात टीम इंडिया 5 गोलंदाजसह उतरणार असल्याने सूर्यकुमार यादवचा अक्षर पटेलच्या जागी समावेश करण्यात आला. दरम्यान, आपल्या टी-20 डेब्यूसह SKY म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्स फलंदाजाने अनोखा विक्रम नोंदवला आहे. (IND vs ENG 2nd T20I 2021: विराट कोहलीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ईशान किशन-सूर्यकुमार यादवचे टी-20 डेब्यू)

वर्षानुवर्षे आयपीएलमधील त्याच्या अतुलनीय कामगिरीमुळे त्याने भारतीय टी-20 संघात आपले स्थान निश्चित केले आहे. तथापि, मालिकेत संधी मिळाल्याने त्याने एका अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. आतापर्यन्त 101 आयपीएल सामने खेळलेला सूर्यकुमार भारतीय टी-20 लीगमध्ये 100 पेक्षा अधिक अधिक सामने खेळल्यानंतर टीम इंडियामध्ये डेब्यू करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमध्ये जबरदस्त धावा करणाऱ्या सूर्यकुमारकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीयापूर्वी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले होते. आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या मोहिमेदरम्यान सूर्यने 16 सामन्यांत 40.22 च्या सरासरीने आणि 145.01च्या स्ट्राईक रेटने 480 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार अर्धशतके देखील झळकावली. सूर्याने 2010 पासून 170 टी -20 खेळले आहेत आणि 19 अर्धशतकांसह 31.56 च्या सरासरीने 3567 धावा केल्या.

दुसरीकडे, शिखर धवनच्या जागी इशान किशनला ओपनर म्हणून स्थान देण्यात आले आहे. अंडर-19 वर्ल्ड कपचा स्टार आयपीएलमध्ये शानदार फॉर्ममध्ये होता आणि त्याने 14 सामन्यात 516 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 145 पेक्षा जास्त होता आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने पुढाकार घेतला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडचे नेतृत्व केल्यानंतर इशानने स्पर्धेच्या सलामीच्या मध्य प्रदेशविरुद्ध सामन्यात विजयी 173 धावांची खेळी केली होती.