IND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन
अभिमन्यु ईश्वर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2021: भारतीय संघ (Indian Team) इंग्लंडविरुद्ध (Wngland) आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी डरहम काउंटी क्रिकेट क्लबमध्ये तयारी करीत आहे. 4 ऑगस्टपासून ब्रिटिश संघाविरुद्ध टीम इंडिया (Team India) पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण त्यापूर्वी संघाला आज एक मोठी खुशखबर मिळाली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha), स्टँडबाय सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) भारतीय संघात सामील झाले. भारताचे कोविड-19 पॉझिटिव्ह थ्रोडाउन तज्ज्ञ दयानंद गारानी यांच्या संपर्कात आल्यामुळे तिघे लंडनमध्ये 10 दिवस क्वारंटाईन होते आणि डरहम येथे अन्य संघात सामील झाले, अशी माहिती बीसीसीआयने (BCCI) शनिवारी दिली. तिन्ही जणांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला होता पण ब्रिटन सरकारच्या दहा दिवसांच्या बंधनकारक क्वारंटाईन नियमांमुळे त्यांना बाहेर बसावे लागले होते. (IND vs ENG Series 2021: दुखापतग्रस्त खेळाडूंची बदली म्हणून भुवनेश्वर कुमार सह श्रीलंका दौऱ्यावरील तीन खेळाडू होऊ शकतात ब्रिटनला रवाना)

साहा आणि ईस्वरन याच कारणामुळे भारताचा 3 दिवसीय सराव सामन्यात काउंटी सिलेक्ट इलेव्हन खेळू शकले नव्हते. स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतलाही साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल सामन्यानंतर टीम इंडियाच्या 21-दिवसांच्या ब्रेक दरम्यान विषाणूची लागण झाली होती. पंत देखील आता बरा झाला आहे आणि डरहम येथे संघात सामील झाला आहे. गुरुवारी अनिर्णित राहिलेल्या सराव सामन्यात पंत आणि साहाच्या अनुपस्थितीत केएल राहुलने भारतासाठी विकेटकीपरची भूमिका बजावली. या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खान आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांना अनुक्रमे क्षेत्ररक्षण व फलंदाजी करताना दुखापत झाली असून दोघेही इंग्लंड दौऱ्यावरून बाहेर पडल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान, नॉटिंगहॅम येथे 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका सुरु होण्यापूर्वी भारत आणखी एक इंट्रा-स्क्वाड सामना खेळेल. या सामन्यातून भारताच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्र स्पष्ट होईल.

इंग्लंड दौर्‍यादरम्यान भारत खेळाडू दुखापतीशी झुंज देत आहेत. सराव सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील फिटनेसच्या कारणास्तव मैदानात उतरले नव्हते. दुसरीकडे, शुभमन गिल यापूर्वीच मालिकेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्क्ल यांना ब्रिटन दौऱ्यावर संघ व्यवस्थापनाची मागणी निवड समितीने फेटाळून लावली होती. तसेच पृथ्वी व पडिक्क्ल सध्या श्रीलंका दौऱ्यावर असल्यामुळे आता ते इंग्लंड रवाना होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.[Poll ID="null" title="undefined"]