विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिका टीम इंडियासाठी (Team India) खूप महत्त्वाची आहे. कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या मालिकेचे वर्णन संघासाठी मोठी मालिका असे केले आहे. भारतीय कर्णधार कोहलीने सोमवारी म्हटले की इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी ‘खूप मेहनत’ आवश्यक आहे आणि पूर्ण उत्कृष्टता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ जो रूटच्या (Joe Root) नेतृत्वातील इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून, बुधवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. मालिकेपूर्वी विराट कोहलीने स्काय स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करणाऱ्या दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) दिलखुलास गप्पा मारल्या. (IND vs ENG: भारताला मोठा धक्का; मयंक अग्रवाल कन्क्शनमुळे पहिल्या टेस्टमधून आऊट, रोहित शर्मासह KL Rahul सलामीला येण्याची शक्यता)

विराट कोहली भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या प्रश्नावर 'स्काय स्पोर्ट्स' म्हणाला, “5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्याला दररोज अथक प्रयत्नांसह उत्कृष्टता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. येथे तुम्हाला स्वतःला पटवून द्यावे लागेल की तुम्हाला कठोर परिश्रम करायचे आहेत आणि प्रत्येक कसोटी सामन्यात दररोज कठीण असलेल्या परिस्थितींना सामोरे जायचे आहे.” गेल्या 14 वर्षांपासून भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने ब्रिटनमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतरच्या दौऱ्यांमध्ये भारताने दोनदा एक कसोटी सामने जिंकले आहेत पण मालिका अद्याप काबीज करता आली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा दुसरा दौरा असून यापूर्वी 2018 दौऱ्यावर भारताला 4-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारतीय कर्णधार म्हणाला की, “तुम्हाला या प्रकारच्या कामाच्या ओझ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल.” तो म्हणाला, “(इंग्लंडमधील कसोटी मालिका जिंकणे) भारतीय क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट असेल आणि आम्ही ती आधीही केली आहे. आम्ही ते पुन्हा करू शकतो, पण मला ही संस्कृती अधिक आवडते. तुम्ही कसोटी सामना गमावला तरी मी माझ्या क्षमतेनुसार सर्व काही करेन.” कोहली पुढे म्हणाला, “कसोटी सामन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण विजय नोंदवण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे कारण मला शरणागती पत्करून सामना वाचवण्याचा प्रयत्न करायला आवडत नाही.”