टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2021: इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस (England Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये भारतीय संघाचा (Indian Team) दौरा कायम आहे. 4 ऑगस्टपासून दोन्ही संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वी इंग्लंड दौर्‍यावर (England Tour) गेलेला टीम इंडियाचा (Team India) एक सदस्य व्हायरसच्या संसर्गाच्या जाळ्यात सापडला आहे, ज्यानंतर या खेळाडूला क्वारंटाईन करण्यात आले आहे. Indian Express च्या अहवालानुसार इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या एका खेळाडूची कोविड-19 टेस्ट सकारात्मक आली आहे आणि अद्याप त्या खेळाडूची ओळख जाहीर केली गेली नसली तरी, तो सध्या त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन असल्याचे समजले जात आहे. तसेच, नंतर डरहॅम येथे नंतर संघात सामील होईल. गुरुवारी टीमचे अन्य सदस्य डरहॅमच्या (Durham) बायो-बबलमध्ये परततील. (IND vs SL ODI 2021: कोविड-19 संकट दरम्यान श्रीलंकन प्रशिक्षकांनी PPE किट परिधान करून सुरु संघाचे प्रशिक्षण Watch Video)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेळाडूला घशात खवखवण्याचा त्रास झाला ज्यानंतर त्याची कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली. या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या संघातील सहकारी आणि सहाय्यक कर्मचार्‍यांनादेखील तीन दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले होते आणि त्यांनी आता हा कालावधी पूर्ण केला आहे. इंग्लंडमध्ये अलिकडच्या काळात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये पुनरुत्थान झाले आहे. तसेच युरो कप 2020 च्या सेमीफायनल आणि फिनलं सामन्या दरम्यान चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे संक्रमणाचा प्रसार होण्याचा धोका आणखी वाढला आहे. या दरम्यान, भारतीय खेळाडूला लागण झाल्याच्या वृत्ताने भारतीय टीम मॅनेजमेन्ट आणि बीसीसीआयची चिंता वाढवली आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये कोविडच्या वाढत्या प्रकरणांचा परिणाम ब्रिटिश संघालाही बसल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी तीन खेळाडू आणि चार कर्मचाऱ्यांसह एकूण सात सदस्यांची सकारात्मक चाचणी आल्याची इंग्लंड बोर्डाने पुष्टी केली होती. ज्यामुळे बोर्डाला मालिकेसाठी संपूर्ण ब्रिटिश संघ बदलण्यास भाग पाडले होते.

इतकंच नाही, इंग्लंड आणि श्रीलंका मालिकेनंतर मायदेशात परतल्यानंतर लंकन कॅम्पमध्येही कोविडचा उद्रेक झाला ज्यामुळे भारत विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका पुढे ढकलण्यात आली. फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जी.टी. निरोशन यांची कोविड-19 चाचणी सकारात्मक झाल्यानंतर मालिका 13 जुलैऐवजी 18 जुलैला हलवण्यात आली.