IND vs ENG 2021: क्रुणाल (Krunal Pandya) आणि हार्दिक (Hardik Pandya)- पांड्या बंधूंसाठी मंगळवारची रात्र एक भावनिक रात्र होती. पुणे येथे इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या सामन्यात ज्येष्ठ भावाने भारतासाठी (India) पदार्पण केले. क्रुणालने आपल्या वनडे करिअरची जबरदस्त सुरुवात केली. त्याने नाबाद 58 धावा फटकावल्या आणि एक विकेट घेतली. क्रुणालनेही 31 चेंडूत 31 धावा फटकावताना एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेगवान अर्धशतकाची देखील नोंद केली. नाणेफेक होण्यापूर्वी लहान भाऊ हार्दिककडून वनडे कॅप मिळवणारा क्रुणाल खेळाच्या आधी आणि नंतर बर्याचदा वडिलांच्या आठवणीने भावुक झाला. कृणालने अर्धशतक झळकवल्यावर आभाळाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन केले. यानंतर डग आउटमध्ये बसलेल्या हार्दिकलाही अश्रू अनावर झाले. सामन्यानंतर हार्दिकने कृणालची मुलाखत घेतली ज्यात त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये कसा जिवंत ठेवला हे उघड केले. (IND vs ENG 1st ODI 2021: पदार्पण सामन्यात विश्वविक्रमी खेळी करणाऱ्या Krunal Pandya याला कॅमेरासमोर अश्रू अनावर, भाऊ हार्दिकने असा दिला आधार)
“हे (त्याची कामगिरी) सर्व आपल्या वडिलांना व्यक्तीला समर्पित आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. हे तुमच्यासाठी आणि माझ्या दोघांसाठी खूप भावनाप्रधान होते. 16 तारखेला त्यांचे निधन झाले आणि त्या दिवशी मी सय्यद मुश्ताक अली खेळत होतो म्हणून दुसर्या दिवसासाठी कपडे रात्री तयार ठेवण्याची त्यांना सवय होती. मग मी काय केले मी बरोदा हून त्यांची बॅग आणली. मला माहित आहे की ते आमच्याबरोबर नाही पण ते खेळ पाहण्यासाठी त्याने परिधान केले पाहिजे असे कपडे माझ्याकडे आहेत, मला वाटलं की मी ते ड्रेसिंग रूममध्ये ठेवावे,” क्रुणालने सांगितले. इतकंच नाही तर कृणालने नुकतंच टीम इंडिया ड्रेसिंग रूममधील आपल्या जागेचा फोटो शेअर केला जिथे त्याच्या वडिलांची कॅप, बूट, शर्ट-पॅट आणि अन्य गोष्टी दिसून येत आहेत. आपल्या वडिलांचे आभासी अस्तित्व आपल्याजवळ असावे असा कृणालचा प्रयत्न होता.
💬 Our father was with us in dressing room: Pandya brothers @hardikpandya7 interviews @krunalpandya24 post his emotional knock on ODI debut. This has all our heart 💙- By @RajalArora #TeamIndia #INDvENG @Paytm
Watch the full interview 🎥 👇https://t.co/yoDGXVi2aK pic.twitter.com/4JrsxtejgC
— BCCI (@BCCI) March 24, 2021
कृणालची इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यांत क्रुणाल बर्यापैकी अडचणीत आला आहे. भारतीय टी-20 संघातून वगळल्यानंतर, वडिलांच्या मृत्यूपूर्वी त्याची आणि अष्टपैलू दीपक हूडा यांच्यात चकमक झाली. कृणालला क्रिकेटपटू बनवण्यात त्याच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.