IND vs ENG 2021: काउंटी XI विरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या सामन्याची वेळ, तारीख व लाईव्ह स्ट्रीमिंग सोबत सर्व माहिती
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs County Championship XI: 4 ऑगस्टपासून यजमान इंग्लंड (England) संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) डरहॅम (Darham) येथे तीन दिवसीय सराव सामन्यासाठी नेट्समध्ये कसून प्रॅक्टिस करत आहेत. सामना डेरहॅमच्या चेस्टर-ले-स्ट्रीट (Chester-le-Street) येथील अमिराती रिव्हरसाइडवर (Emirates Riverside) खेळला जाणार आहे. हा सराव सामना 22 ते 22 जुलै दरम्यान डरहॅमच्या एमिरेट्स रिव्हरसाईड मैदानावर होईल. या सामन्यासाठी काउंटी सिलेक्ट इलेव्हन (County Select XI) संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी वार्विकशायरच्या विल ऱ्होड्सकडे सोपवण्यात आली आहे. 20 दिवसांच्या ब्रेकनंतर सामन्यांच्या तयारीसाठी भारतीय खेळाडू नेट्समध्ये कोणतीही कसर सोडत नाही आहेत. इतकंच नाही तर भारतीय क्रिकेट चाहते या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकतात. (IND vs ENG Series 2021: इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाकडे आहे ‘हे’ 4 ओपनिंग कॉम्बिनेशन, पण अखेर कोणाची लागणार वर्णी)

स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरु होईल. म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सामना खेळला जाईल. काऊंटी चॅम्पियनशिप संघात प्रथम श्रेणी सामने खेळणाऱ्या विविध काउंटी संघांतील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच प्रत्येक दिवशी प्रत्येकी 90 ओव्हरचा खेळ होणार आहे. या सराव सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भारतीय संघाचे चाहते डरहॅम क्रिकेटच्या युट्यूब चॅनेलवर या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतात. इंग्लंड मालिकेपूर्वी भारताच्या पहिल्या नेट सेशनचे फोटो बीसीसीआयने शनिवारी शेअर केले. “डरहॅम काउंटी क्रिकेट क्लब येथे टीम इंडियाच्या नेट सेशनमधील फोटोज,” बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. फोटोंमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामी फलंदाज रोहित शर्मा, कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल नेटमध्ये फलंदाजी करताना दिसून येत आहेत तर भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, मोहम्मद सिराज गोलंदाजी करताना दिसत आहेत.

भारताचा संघ: विराट कोहली (कॅप्प्टीन), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर; फिटनेस क्लीयरन्सच्या अधीन).