IND vs ENG 1st Test Likely Playing XI: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे काउंटडाउन सुरु झाले आहे. ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या दुसऱ्या चक्राचा एक भाग म्हणून दोन्ही संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या सत्रातील हा पहिला कसोटी सामना असल्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील. मात्र, मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला (Indian team) दुखापतींचा फटका बसला आहे. शुभमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) देखील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. अशास्थितीत आता रोहित शर्मासोबत सलामीला कोणत्या खेळाडूची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मधल्या फळीत केएल राहुलला (KL Rahul) खेळवण्याच्या त्यांच्या सुरुवातीच्या निर्णयातून यू-टर्न घेतला नाही तर सलामीवीर म्हणून अभिमन्यू ईश्वरन हा फक्त दुसरा पर्याय आहे. मात्र असे होण्याची शक्यता कमीच आहे. (IND vs ENG 2021: पुढील स्टेशन इंग्लंड! कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला दिलासादायक माहिती, दोन धाडक फलंदाज ब्रिटनला रवाना See Photo)
मयंकच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुलची सलामी फलंदाज म्हणून निवड होण्याची अधिक शक्यता असून टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. तसेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर दबाव वाढत असतानाही मधल्या फळीत बदल होण्याची शक्यता नाही. टीम इंडियाचा फलंदाजी विभाग रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्यासह कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यासह अधिक मजबूत दिसत आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना कितीही अनुकूल असली तरी रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा दोघेही पहिल्या कसोटीसाठी इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. जडेजाचे अष्टपैलू कौशल्य सध्या भारतासाठी महत्त्वाचे आहे आणि अश्विन कसोटीत संघाचा प्राथमिक फिरकीपटू आहे.
गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून शार्दूल ठाकूरचा समावेश केला जाऊ शकतो. ठाकूरकडे चेंडूसोबत बॅटने देखील चांगले योगदान देण्याची क्षमता आहे.
भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.