विराट कोहली (Photo Credit: ICC/Twitter)

IND vs ENG 1st Test: भारतासमोर (India) इंग्लंड क्रिकेट टीम (England Team) नॉटिंगहम  (Nottingham) येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हतबल झालेला दिसला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर ब्रिटिश संघ नॉटिंगहम कसोटीच्या पहिल्या डावात 183 धावांवर गारद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, मोहम्मद शमीने 3, शार्दुल ठाकूरने 2 आणि मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो निर्णय त्यांच्यावर उलटला. इंग्लंडसाठी कर्णधार जो रूट वगळता एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. रूटने सर्वाधिक 64 धावा केल्या. तसेच जॉनी बेअरस्टोने 29 धावांचे योगदान दिले. या सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडच्या डावातील 54 व्या षटकात विरोधी फलंदाज जोस बटलरच्या (Jos Buttler) बाद होण्याची भविष्यवाणी करताना दिसला. (IND vs ENG 1st Test Day 1: रिषभ पंतने DRS घेण्यासाठी विराट कोहलीला पटवले; कॅच व स्टंप आऊट न करता भारताला मिळवून दिले मोठे यश, व्हिडिओ पाहून म्हणाल वाह!)

ब्रिटिश संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा 52 व्या ओव्हर दरम्यान तो वेगवान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासमोर असहाय्य दिसला. बटलरने सातत्याने चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू सोडण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, पहिल्या स्लिपवर उभ्या भारतीय कर्णधाराने बटलर क्लीन बोल्डचा अंदाज वर्तवला. रिषभ पंतच्या जवळ उभा असलेला कोहली म्हणाला, 'आता आऊट होईल.' मात्र, बटलर पुढच्या चेंडूवर बाद झाला नाही, पण बुमराहच्या पुढील षटकात पुन्हा तीच घटना घडली आणि बटलर भोपळा न फोडता पॅव्हिलियनमध्ये परतला. बटलरने बुमराहच्या चेंडूवर पंतकडे झेलबाद होऊन माघारी परतला. अशाप्रकारे, सहा महिन्यांनंतर पहिली कसोटी खेळणारा जोस बटलर पूर्ण फ्लॉप ठरला.

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे तर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर आता भारतीय फलंदाजांवर संघाला मोठी आघाडी मिळवून जबाबदारी आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा व केएल राहुलची सलामी जोडी मैदानात प्रत्येकी 9 धावा करून खेळत होती. हे दोन्ही फलंदाज सध्या शानदार फॉर्ममध्ये संघाला प्रभावी सुरुवात करून देण्याची मदार त्यांच्यावर आहे. शिवाय, भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील 183 धावसंख्येचा प्रत्युत्तरात 162 धावांनी पिछाडीवर आहेत.