IND vs ENG 1st Test: भारत (India) आणि यजमान इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम (Nottingham) येथे खेळला जात आहे. पावसामुळे तिसऱ्या दिवशी फक्त 49 ओव्हरचा खेळ झालं ज्यात भारताने पहिल्या डावात 278 धावा केल्या तर इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 25 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 183 धावा केल्या होत्या आणि भारत अजूनही त्यांच्यापेक्षा 70 धावांनी आघाडीवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि इंग्लंडचा अनुभवी जेम्स अँडरसन (James Anderson) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शुक्रवारी दुसऱ्या सत्रात सिराज आणि बुमराह इंग्लिश गोलंदाजांवर भारी पडत असताना ही घटना घडली. (IND vs ENG 1st Test: James Anderson ची विश्वविक्रमाला गवसणी, अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडीत काढत बनला सर्वकालीन महान वेगवान कसोटी गोलंदाज)
यामुळे इंग्लंडचे खेळाडू हतबल झालेले दिसले. कर्णधार जो रूटने त्यांच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक अँडरसनच्या दिशेने रागाने थ्रो केला. सिराज आणि बुमराहने धाव फलक हलता ठेवला आणि संघाला मोठी आघाडी मिळवून दिले. यामुळे साहजिकच इंग्लंड गोलंदाज निराश झाले. त्यामुळे, अँडरसनने आपल्या ओव्हर दरम्यान सिराजला काही शब्द ऐकवले. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजही मागे राहिला नाही आणि त्याने अँडरसनशी पंगा घेतला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रादरम्यान 84 वी ओव्हर पूर्ण केल्यानंतर अँडरसन सिराजकडे वळला आणि काही बोलला. यावर भारतीय वेगवान गोलंदाजानेही पलटवार करत लगेच प्रत्युत्तर दिले. मात्र, हे प्रकरण फारसे वाढले नाही आणि अँडरसन परत फिल्डिंगकडे वळला. दोन्ही खेळाडू लगेच शांत झाले, पण अँडरसन आणि सिराज यांच्यातील गरमागरमीचा व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwani45singh) August 6, 2021
दरम्यान, अँडरसनबद्दल बोलायचे तर त्याने 54 धावा देऊन 4 विकेट्स काढल्या आणि अनिल कुंबळेच्या 619 विकेट्सना मागे टाकत एकूण कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला. अँडरसनने 4 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्यात केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता. दुसरीकरडे, भारताला 278 धावांवर गुंडाळत त्याचा युवा सहकारी ओली रॉबिन्सनने आपल्या पहिल्या पाच विकेट्स घेतल्या.