रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 4: चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने (Indian Team) 13 ओव्हरमध्ये 1 बाद 39 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) 12 धावा करून माघारी परतला. दिवसाखेर यजमान संघासाठी चेतेश्वर पुजारा 12 धावा आणि शुभमन गिल (Shubman Gill) 15 धावा करून खेळत होते. इंग्लंडकडून जॅक लीचला (Jack Leech) 1 विकेट मिळाली. आता मंगळवार, 9 फेब्रुवारी रोजी सामन्याच्या अंतिम दिवशी संघाला आणखी 381 धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांनी शानदार बॉलिंग करत इंग्लंडला दुसऱ्या डावात 178 धावांवर गुंडाळलं. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.  इंग्लंडकडे दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी होती, ज्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान मिळाले. (IND vs ENG 1st Test Day 4: रविचंद्रन अश्विन, इशांत शर्माची ऐतिहासिक बॉलिंग, चेन्नईमध्ये चौथ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड)

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त सुरुवात केली. रोहित-शुभमनच्या जोडीने इंग्लंड गोलंदाजांची कसून धुलाई केली. रोहितने 1 चौकार आणि षटकार खेचला तर शुभमनने 3 चौकार मारत पाहुण्या संघाला दबावात टाकण्याचा प्रयन्त केला मात्र, जॅक लीचने संघाला रोहित शर्माच्या रूपात मोठी विकेट मिळवून दिली. रोहितने पुन्हा एकदा निराशा केली आणि अवघ्या 12 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला. इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 337 धावांवर रोखले ज्यामुळे, त्यांना दुसऱ्या डावात 241 धावांची आघाडी मिळाली. पाहुण्या संघासाठी दुसऱ्या डावात कर्णधार जो रूटने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याशिवाय ओली पोपने 28, जोस बटलर 24, डॉम बेसने 25 धावांची छोटेखानी खेळी करत योगदान दिले. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करत इंग्लंड फलंदाजांना अडचणीत टाकले. अश्विनने 17.3 ओव्हरमध्ये 61 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनला बाद करत डावात 6 विकेट्स पूर्ण केल्या. शिवाय, शहाबाज नदीमने 2, तर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, टीम इंडियाने 2016 नंतर भारतात खेळत एकही कसोटी सामना गमावलेला नाही त्यामुळे, अंतिम दिवशी विजय कोणाच्या पदरात पडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.