भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 3: नॉटिंगहमच्या(Nottingham)  ट्रेंट ब्रिज येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा (Indian team) पहिला डाव 84.5 ओव्हरमध्ये 278 धावांवर आटोपला. केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी अर्धशतकी डावाच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) यजमान इंग्लंड संघावर 95 धावांची आघाडी घेतली आहे. ब्रिटिश संघाचा पहिला डाव 183 धावांवर संपुष्टात आला होता. दरम्यान, भारताकडून राहुलने सर्वाधिक 84 धावा काढल्या. तसेच जडेजाने 56 आणि सलामीवीर रोहित शर्माने 36 धावांचे योगदान दिले. शिवाय, रिषभ पंतने देखील 25 रन केले. दुसरीकडे, यजमान संघासाठी अनुभवी जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन चेंडूने यशस्वी ठरले. अँडरसनने 4 विकेट्स घेतल्या तर रॉबिन्सनने त्याला साथ देत भारतीय 5 फलंदाजांना माघारी धाडलं. (IND vs ENG 1st Test: James Anderson ची विश्वविक्रमाला गवसणी, अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडीत काढत बनला सर्वकालीन महान वेगवान कसोटी गोलंदाज)

तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 4 बाद 124 पासून पुढे खेळायला सुरुवात केली. पावसामुळे दिवसाच्या खेळात बदल झाला. दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 11 चेंडूंचा खेळ झाला असताना पुन्हा एकदा पाऊस सुरु झाल्याने खेळ स्थगित करण्यात आला. सामना सुरु होताच काही वेळातच पंतला रॉबिनसनने बाद केले. त्यानंतर राहुलने जडेजाच्या साथीने संघाचा डाव सावरत इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली आणि संघाला दोनशे पार नेले. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत असताना सुरुवातीपासून खेळपट्टीवर तग धरुन असलेला सलामीवीर राहुलला 84 धावांवर असताना अँडरसनने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल पाठोपाठ अँडरसनने शार्दुल ठाकूरला जाळ्यात अडकवलं. आक्रमक फलंदाज रवींद्र जाडेजा 56 धावांवर बाद झाला.

दरम्यान, सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियासाठी चांगला ठरला होता तर अँडरसनने दुसऱ्या दिवशी पावसाने खेळ खराब करण्यापूर्वी टीमला सामन्यात पुनरागमन करून दिले होते. अँडरसनसाठी भारताविरुद्ध पहिला डाव आणखी खास ठरला. राहुलला बाद करत त्याने अनिल कुंबळेच्या तिसऱ्या सर्वाधिक कसोटी विकेट्सना मागे टाकले आणि महान गोलंदाजानाच्या यादीत तिसरे स्थान पटकावले.