आर अश्विन, भारत-इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 1st Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या चेन्नई टेस्टच्या (Chennai Test) पहिल्या सत्राची घोषणा झाली आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले तर रॉरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉम सिब्लीच्या (Dom Sibley) जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या दिवशी लंचपर्यंत भारतीय फिरकीपटूंचा सावधगिरीने सामना करत पहिल्या सत्रात ओव्हरमध्ये 2 बाद 67 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्राखेर बर्न्स 33 धावा आणि डॅन लॉरेन्स शून्यावर करून माघारी परतले तर सिब्ली 26 धावा आणि कर्णधार जो रूट (Joe Root) 4 धावा करून खेळत होते. पहिल्या दिवसाच्या लंचपर्यंत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टीम इंडियाला (Team India) दोन यश मिळवून दिले. आजपासून सुरु झालेल्या भारत आणि इंग्लंड संघातील चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (IND vs ENG 1st Test 2021: टीम इंडियामध्ये काही तासांपूर्वी निवडलेल्या ‘या’ फिरकीपटूला Chennai टेस्ट सामन्यात मिळाली संधी, Kuldeep Yadav याला पुन्हा डच्चू)

टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व जो रुट करत आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडसाठी बर्न्स आणि सिब्लीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे दोंघांनी सावध फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 63  धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्रात टीम इंडियाला विकेटसाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण अश्विनने बर्न्सला विकेटच्या मागे रिषभ पंतकडे झेलबाद करत अखेर ही जोडी मोडली. बर्न्सने 60 चेंडूत 2 चौकार खेचत 33 धावा केल्या. यानंतर दुपारच्या जेवणाच्या काही मिनिटांपूर्वी बुमराहने लॉरेन्सला एलबीडब्ल्यू आऊट करत इंग्लिश टीमला दुसरा झटका दिला. लॉरेन्स भोपळा न फोडता माघारी परतला. आता इंग्लंडसाठी मोठा स्कोर करण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी सिब्ली आणि रूटच्या जोडीकडून खेळपट्टीवर टिकून खेळण्याची अपेक्षा असेल.

दुसरीकडे, पहिल्या सामन्यात टीम इंडियामध्ये कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कमबॅक केलं आहे तर फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.