IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई (Chennai) येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी पराभव पत्करल्यानंतर इंग्लंडने (England) अधिकपट चांगले क्रिकेट खेळले आणि काही गोष्टींवर वजन राखले असल्याची कबुली टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सामन्यानंतर दिली. कोहली म्हणाला की, अपेक्षेप्रमाणे दबाव आणण्यात भारत अपयशी ठरला आणि विकेटच्या निसर्गाचा स्वभाव पाहता टॉस गमावल्याचा फारसा फायदा झाला नाही. “आम्ही पहिल्या सहामहीत चेंडूने त्यांच्यावर पुरेसा दबाव आणला असे मला वाटत नाही. सामन्यात बॉलिंग युनिट म्हणून वेगवान गोलंदाज आणि अश्विन पहिल्या डावात चांगली कामगिरी करत होते पण आम्हाला आणखी काही धावा रोखण्याचा आणि दबाव निर्माण करण्याची गरज होती. ही धीमी विकेट होती आणि गोलंदाजांना मदत न करता फलंदाजांना स्ट्राईक रोटेट व खेळ करणे सोपे केले. पहिल्या दोन दिवसांत त्यात फारसे काही घडत नव्हते असे दिसले,” कोहलीने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात म्हटले. (IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडचा विराटसेनेवर दणदणीत विजय, ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणं)
विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा कसोटी सामन्यातील हा सलग चौथा पराभव ठरला. न्यूझीलंडविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड येथील पराभवानंतर भारताचा किंग कोहलीच्या नेतृत्वातील चौथा पराभव ठरला. कोहलीने मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाझ नदीमच्या गोलंदाजीने नाखूष दिसला. चौथ्या आणि पाचव्या गोलंदाजाने केलेल्या कामगिरीवरीही कोहलीने लक्ष वेधले. रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 3/146 आणि दुसऱ्या डावात 6/61 अशी कामगिरी केली तर नदीम दोन्ही डावात फेल झाला. पहिल्या डावात सुंदरला 26 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नाही तर नदीमने 167 धावा देत 2 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात डावात नदीमने 15 ओव्हर गोलंदाजी केली 66 धावांवर 2 गडी बाद केले तर, सुंदरने एक ओव्हर गोलंदाजी केली.
इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया पुन्हा एकदा 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान चेपॉक येथे दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरेल. यजमान भारतीय संघ सध्या मालिकेत 0-1 अशा पिछाडीवर असून दुसऱ्या चेन्नई टेस्टमध्ये विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. शिवाय, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी देखील भारताला विजय गरजेचा आहे.