IND vs ENG 1st Test 2021: भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि चायनामन कुलदीप यादव (Kuldeep Yadav) चेन्नई टेस्ट (Chennai Test) दरम्यान भारतीय संघाच्या (Indian Team) ड्रेसिंग-रूममध्ये कथित भांडणात अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chepauk Stadium) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दिवसाचा खेळ संपल्या वेळचा आहे. जो रूटच्या इंग्लिश टीमविरुद्ध पहिल्या सामन्यात दोन्ही गोलंदाजांना भारताने बेंचवर बसवण्याचा निर्णय घेतला. चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सिराज कुलदीप यादवची मान पकडताना दिसून येत आहे. तथापि, कुलदीप आणि सिराज यांच्यात झालेल्या भांडणाचा खरा निष्कर्ष काय होता हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसले नाही परंतु त्यांच्या तापट भांडण झाल्याचे दिसत होते. (IND vs ENG 1st Test Day 3: जो रूटने घेतलेला अफलातून कॅच पाहून अजिंक्य रहाणेसह सारेच थक्क, पहा Video)
व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री देखील दिसत आहेत. सिराजची कृती शंकास्पद असू शकते, परंतु हे फक्त दोन मित्रांमधील हावभाव असू शकते.एका छोट्या क्लिपमध्ये सिराज आक्रमकपणे कुलदीपची मान पकडतो, परंतु इतर काहीही दिसण्याआधी कॅमेरा मुख्य प्रशिक्षक शास्त्रीकडे वळला. ऑस्ट्रेलियाविरुद्द डाऊन अंडर भारतीय संघाचं शानदार कसोटी मालिका विजयाचा सिराज एक शिल्पकार होता. सिराजने मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाच विकेट्स मिळवत पदार्पण केले. ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटी सामन्यात सिराजने कसोटीत पाच विकेट्स घेत संघाला आघाडी मिळवून दिली.
दुसरीकडे, कुलदीपने जानेवारी 2019 पासून कसोटी सामना खेळलेला नाही. गब्बा टेस्ट सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाल्याने कुलदीपची खेळण्याची प्रतीक्षा लांबली. कुलदीपने अखेरचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे 2018-19 मध्ये खेळला ज्यात त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एकदिवसीय सामना खेळला आणि 57 धावा देत 1 विकेट घेतली. चेन्नई कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनकडून वगळल्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटू चकित झाले होते.