IND vs ENG 1st Test Day 3: जो रूटने घेतलेला अफलातून कॅच पाहून अजिंक्य रहाणेसह सारेच थक्क, पहा Video
चेन्नई टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. चहापानपर्यंत संघाने शंभर धावसंख्येच्या आत टीम इंडियाच्या चार फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बॅटने भारतीय गोलंदाजांची धुलाई केल्यावर रूटने फिल्डिंगमधेही छाप सोडली आणि जबरदस्त कॅच पकडून रहाणेला स्वस्तात माघारी धाडलं.
IND vs ENG 1st Test Day 3: चेन्नई टेस्ट (Chennai Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या इंग्लंडचा (England) पहिला डाव 578 धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची (Indian Team) खराब सुरुवात झाली. चहापानपर्यंत संघाने शंभर धावसंख्येच्या आत टीम इंडियाच्या चार फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने (Team India) सलामी जोडी पाठोपाठ कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचीही विकेट लवकर गमावली आहे. रोहित शर्मा 6, शुभमन गिल 29, कर्णधार विराट कोहली 11 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) बॅट इंग्लंड गोलंदाजांपुढे शांत राहिली. रहाणे 1 धाव करून डोम बेसच्या (Dom Bess) चेंडूवर इंग्लिश कर्णधार जो रूटकडे (Joe Root) झेलबाद झाला. बॅटने भारतीय गोलंदाजांची धुलाई केल्यावर रूटने फिल्डिंगमधेही छाप सोडली आणि जबरदस्त कॅच पकडून रहाणेला स्वस्तात माघारी धाडलं. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोडला 10 वर्ष जुना रेकॉर्ड, केला लाजीरवाणा कीर्तिमान)
विराट बाद झाल्यावर उपकर्णधार रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी मैदानावर आला पण, तो फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. रहाणेला 6 चेंडूत 1 धावांवर खेळत असताना बेसने झेलबाद केले. कर्णधार रूटनेडावीकडे उडी घेत रहाणेचा जबरदस्त झेल पकडला. नुकताच क्रीजवर आलेल्या रहाणेने क्रीजच्या बाहेर जाऊन कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केला पण चेंडू ग्राउंडवर ठेवण्यात अपयशी ठरला आणि कव्हरवर उभा असलेल्या रूटने त्याच्या डाव्या दिशेने डाईव मारली आणि अविश्वसनीय झेल घेत सर्वानाच स्तब्ध केलं. दोन ओव्हरमध्ये डॉम बेसचीही दुसरा विकेट होती. त्याला पहिले भारतीय कर्णधार विराट कोहलीची मोठी विकेट मिळाली आणि त्यानंतर त्याने रहाणेची विकेट घेत इंग्लंडला तिसर्या दिवशी आघाडी मिळवून दिली. पहा व्हिडिओ:
Joe Root’s catch to remove Ajinkya Rahane is a stunner.#INDvENG pic.twitter.com/0hf0Fo6mRR
— Nic Savage (@nic_savage1) February 7, 2021
याआधी, 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या रूटने भारताविरुद्ध पहिल्या डावात आतापर्यंत चमकदार कामगिरी करत कसोटी क्रिकेटमधील पाचवे आणि कर्णधार म्हणून तिसरे द्विशत झळकावले. पहिल्या डावात रूटने 218 धावा केल्या आणि 578 धावांसह इंग्लंडला भक्कम स्थितीत नेलं. पाहुण्या संघाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात संपुष्टात आला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2021 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

