विराट कोहली आणि इयन मॉर्गन (Photo Credit: Facebook)

IND vs ENG 1st ODI 2021: पुणे (Pune) येथे भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Mahatrashtra Cricket Association) स्टेडियमवर संपूर्ण मालिका प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाणार आहे. आजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून भारतीय वनडे संघात अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि फिरकीपटू प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) पदार्पण केले आहे. कृणाल भारतीय टी-20 संघाचा भाग होता तर प्रसिद्धचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. शिवाय, आजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीला उतरेल, तर श्रेयस अय्यर चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. शिवाय, कुलदीप यादवचा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. (IND vs ENG 1st ODI 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिला वनडे सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर)

दुसरीकडे, इयन मॉर्गन इंग्लिश टीमचे नेतृत्व करेल. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोची जोडी संघाच्या डावाची सुरुवात करतील. यंदा संघाला बेन स्टोक्स आणि डेविड मलान यांच्याकडून बॅटने प्रभावी कामगिरी करण्याची मोठी अपेक्षा असेल. मलानला अखेरच्या टी-20 सामन्यात सूर गवसला ज्यामुळे तो धोकादायक सिद्ध होऊ शकतो. सॅम बिलिंग्सकडे देखील फलंदाजीने विरोधी संघाच्या नाकीनऊ आणण्याची क्षमता आहे. गोलंदाजी विभागात संघाला जोफ्रा आर्चरची कमतरता जाणवू शकते. आर्चरच्या जागी टॉम कुरनला इंग्लिश संघात संधी मिळाली असून मोईन अलीने संघात परतला आहे.

भारताचा प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (विकेटकीपर), बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्ज, मोईन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद आणि मार्क वुड.