(Photo Credits: Twitter)

इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये एकीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma), के. एल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) आपल्या खेळीने चर्चेत राहिले आहेत तर दुसरीकडे माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) आपल्या संथ खेळीने चाहते आणि क्रिकेट तज्ञ त्याच्यावर टीका करत आहेत. संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar),सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), नासिर हुसेन (Nasser Hussain) सारखे दिग्गज खेळाडूंनी धोनीवर टीकेचा बाण सोडला आहे. आणि यंदाही बर्मिंघम येथे झालेल्या बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध सामन्यात धोनीला त्याच्या स्लो खेळीसाठी सोशल मीडियावरील चाहत्यांनी पुन्हा फटकारले आहे. (ICC World Cup 2019: रोहित शर्मा ने मारलेला षटकाराचा चेंडू 'तिला' लागला; हिटमॅन ने ऑटोग्राफ कॅप देऊन केली भरपाई, पहा Photo)

सचिनने धोनीच्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळीची टीका करत म्हणाला, "मला काहीशी निराशा झाली आहे, ही खेळी चांगली झाली असती. धोनी आणि केदार जाधव यांच्या भागीदारीमुळे मी खूप आनंदी आहे. पण ते खूपच मंद होते. धोनीच्या फलंदाजीची कोणतीही सकारात्मक इच्छा नव्हती". मात्र, आता तोच सचिन धोनीच्या समर्थनात उतरला आहे. सचिनच्या मते धोनी हा एक फलंदाज आहे जो पहिल्यांदा भारतीय संघाचा विचार करतो. इंडिया टुडे (IndiaToday) शी बोलताना सचिन म्हणाला, "बांग्लादेशविरूद्ध धोनीची खेळी खूप महत्त्वपूर्ण होती. त्यांनी संघाला आवश्यक ते केले. जर तो 50 व्या ओव्हर [पर्यंत टिकून खेळतो तर याची उर्वरित फलंदाजांना क्रीजवर मदत होते. आणि त्याच्याकडून अशीच आशा होती आणि त्यांनी ते केले."

दरम्यान, बांगलादेशला नमवत टीम इंडिया ने सेमीफाइनलचे तिकीट पक्का केले आहेत. संघाचा ग्रुप स्टेज मधील अंतिम सामना श्रीलंका (Sri Lanka) शी 6 जुलैला खेळाला जाईल. भारत-श्रीलंका सामना हेडिंग्ले (Headingley) च्या मैदानात होईल.