आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज भारता (India) चा सामना बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध होणार आहे. एजबस्टन (Edgbaston) मैदानावर होणाऱ्या या सामन्यात टॉस जिंकून टीम इंडिया पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मध्ये दोन बदल करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) संघात परतला आहे तर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) ला संघात स्थान मिळाले आहेत. दुरीकडे, बांगलादेशने ही दोन बदल केले आहेत. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून भारताला सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात भारताला सावध राहणे गरजेचे आहे. (IND vs ENG मॅचमध्ये बोटातून रक्त निघत होते तरीही टीम इंडिया ला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता धोनी, Netizens ने केली प्रशंसा View Photos)

आतापर्यंत टीम इंडियाने 7 सामना खेळले आहेत. यातील पाच सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला आणि एका सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. इंग्लंड (England) विरोधात सामना गमावल्यानंतर सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकावा लागणार आहे.

असे आहे टीम इंडिया आणि टीम बांग्लादेश:

भारत: रोहित शर्मा, के. एल राहुल, विराट कोहली(कॅप्टन), रिषभ पंत, एम. एस धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

बांगलादेश: तमीम इक्बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मशरफे मुर्तजा(कॅप्टन), मुशफिकुर रहीम, लिटन दास, मोसदेक हुसैन, मो. सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, शब्बीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन.