भारत (India) आणि बांग्लादेश (Banglades) यांच्यात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवटचा सामना लवकरच सुरू होईल. या निर्णायक मॅचमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार महमूदुल्लाह (Mahmudullah) याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मालिकेतील अंतिम सामना आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आजच्या अंतिम सामन्यात आपला सर्वश्रेष्ठ खेळ करण्याचा प्रयत्न करतील. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. कृणाल पंड्या (Krunal Pandya) याला प्लेयिंग इलेव्हनमधून वगळण्यात आले असून मनीष पांडे (Manish Pandey) याला संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे बांग्लादेशच्या संघातही एक बदल करण्यात आले आहेत. (Rishabh Pant वरील प्रकाशझोत थोडे दिवस कमी करा; Rohit Sharma ची प्रेक्षकांना विनंती)
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेश संघाने ७ विकेटने सामना जिंकला होता, परंतु राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव करत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. भारत-बांग्लादेश 10 वेळा टी-20 सामन्यात आमने-सामने आले आहेत, यातील 9 मध्ये टीम इंडियाने तर एका सामन्यात बांग्लादेशने विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्ममध्ये पुनरागमनानंतर टीम इंडिया उत्साहित आहे. त्याने मालिकेच्या 100 व्या आणि दुसर्या सामन्यात 43 चेंडूत 85 धावांची खेळी करून भारतासाठी एकतर्फी विजय मिळवला होता. महमूदुल्लाच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी करणारा बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून प्रथमच भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
असा आहे भारत-बंगालदेशचा प्लेयिंग इलेव्हन:
टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दूबे, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, खलील अहमद.
टीम बांग्लादेश: लिटन दास, सौम्या सरकार, मोहम्मद नैम, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह (कॅप्टन), आफिफ हुसेन, मोहम्मद मिथुन, शैफुल इस्लाम, अल-अमीन-हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि अमीनुल इस्लाम