बीसीसीआयचे (BCCI) नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील दुसरा टेस्ट सामना डे/नाईट होईल असा विश्वास दर्शवला आहे. भारत-बांग्लादेश संघात 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान हा सामना ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) खेळला जाणार आहे. गांगुलीने सोमवारी आशा व्यक्त केली की बांग्लादेश ईडन गार्डन्स येथे डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास तयार होईल. बांग्लादेश संघ आजवर गुलाबी बॉलसह खेळण्यापासून वाचण्याचा प्रयत्नात होता. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB)) वरिष्ठ खेळाडूंसोबत बैठक घेतल्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षांना या संदर्भातील निर्णयाची माहिती देईल. गांगुली यांनी पीटीआयला सांगितले की, "मी बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन यांच्याशी बोललो आहे. ते सहमत आहे, त्यांना या विषयावर खेळाडूंशी बोलायचं आहे. मला खात्री आहे की दुसरा टेस्ट सामान डे-नाईट होईल. ते लवकरच याची अधिकृत घोषणा देखील करतील. आशा आहे की, आज रात्री 10 ते 10.30 पर्यंत आम्हाला माहिती मिळेल." (IND vs BAN Test 2019: ईडन गार्डन्सवर BCCI खेळवू शकते पहिली Day/Night टेस्ट मॅच, बांग्लादेश बोर्डला दिला प्रस्ताव)
दरम्यान, बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख आणि माजी कर्णधार अक्रम खान यांनी कबूल केले की, फ्लडलाईटमध्ये गुलाबी बॉलसह खेळण्यासाठी संघाची तयारी नसणे यासारखे व्यावहारिक मुद्दे त्यांच्या समोर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ज्याप्रकारे वार्षिक 'गुलाबी कसोटी' (डे-नाईट) कसोटी सामना होतो आणि त्याच प्रकारे दरवर्षी ईडन गार्डन्स येथे डे/नाईट टेस्ट आयोजित केला जावा अशी गांगुलीची इच्छा आहे. डे/नाईट टेस्टचं समर्थन करताना गांगुलीने याला भविष्याची गरज म्हणून संबोधले.
दुसरीकडे, बांग्लादेश बोर्ड जर भारताचे डे/नाईट टेस्ट खेळण्याचे आमंत्रण स्वीकारते तर गांगुली इतिहास रचतील, कारण यापूर्वी भारतीय संघ कधीच 'पिंक बॉल' टेस्ट खेळला नाही आहे. भारतीय क्रिकेटपटूने डे/नाईट कसोटी सामना खेळणे टाळत आले आहेत, पण गांगुलीने शुक्रवारी सांगितले की, कर्णधार विराट कोहली डे-नाईट कसोटी खेळण्याच्या कल्पनेशी सहमत आहे आणि नजीकच्या भविष्यात हा सामना खेळला जाऊ शकतो.