IND vs BAN 1st Test Day 2: मयंक अग्रवाल सुसाट, तिसरे टेस्ट शतक करत विजय मर्चंट यांची केली बरोबरी, जाणून घ्या
मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty Images)

इंदोरमध्ये बांग्लादेश(Bangladesh) विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा (India) सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने शानदार शतक ठोकले. त्यानंतर त्याच्या नावावर अनेक विक्रमाची नोंद केली आहे. भारताकडून पहिला डाव खेळणार्‍या मयंकने 60 व्या ओव्हरमध्ये 15 चौकार आणि 1 षटकाराने 185 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले. अशाप्रकारे, मयंकने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 4 कसोटींमध्ये 8 डावांत 6 अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये सलामी फलंदाज म्हणून पदार्पण करणारा मयंक सर्वाधिक सरासरीने फलंदाजी करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून मयंकची सरासरी 64 च्या आसपास आहे. यात मयंकच्या मागे- पुढे कोणीही नाही आहे. बांग्लादेशविरुद्ध मयंकने 183 चेंडूत शतक पूर्ण केले आणि आता तो दुहेरी शतकाच्या जवळ पोहचत आहे. (IND vs BAN 1st Test: उत्साही चाहत्यांनी विराट कोहली याचे ऐकले आणि मोहम्मद शमी याने घेतली आणखी एक विकेट, पाहा Video)

मयंक कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावात तीन शतका ठोकणारा चौथा फलंदाज ठरला. या प्रकरणात रोहित शर्मा याने 4 डावात तीन शतक, माजी सलामी फलंदाज सुनील गावस्कर यांनी7 डावात, के एल राहुल याने 9, तर मयंकने विजय मर्चंट (VIjay Merchant) 12 डावांमध्ये तीन शतक करत त्यांची बरोबरी केली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये मयंकने भारतीय भूमीवर सर्वाधिक शतक ठोकण्याच्या दृष्टीने अनुभवी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन, अँडी फ्लॉवर, अँड्र्यू स्ट्रॉस, केन बॅरिंग्टन आणि गॅरी सोबर्स या दिग्गज खेळाडूंची तीन शतकांसह बरोबरी केली आहेत.

मयंकने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून भारतासाठी सलामी फलंदाजाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्यानंतर त्याने टीम इंडियाच्या टेस्ट संघात आपले स्थान निश्चित केले आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही मयंकने भारतीय भूमीवर दुहेरी शतक झळकावले होते. सध्याच्या सामन्याबद्दल बोलताना बांग्लादेश संघ पहिल्या डावात 150 धावनावर ऑल आऊट झाला. आता पहिल्या डावात टीम इंडिया मोठी आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या टीम इंडियाने पहिल्या डावांत शंभरपेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.